प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी अनुष्का घातलेला सिंपल कुर्ता तुम्हालाही परवडेल! किंमत फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 15:08 IST2025-05-16T15:08:30+5:302025-05-16T15:08:54+5:30
अनुष्काने घातलेल्या सुंदर आणि सिंपल ड्रेसची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी अनुष्का घातलेला सिंपल कुर्ता तुम्हालाही परवडेल! किंमत फक्त...
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली अलीकडेच वृंदावनला पोहोचले होते. या दोघांनी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वादही घेतले. सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. यावेळी अनुष्काने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिनं परिधान केलेला हा ड्रेस तुम्हीदेखील खरेदी करू शकता. कारण, तो फारच स्वस्त आहे. तर आपण जाणून घेऊया तिच्या ड्रेसची किंमत किती होती.
अनुष्का प्रत्येक वेळी हटके लुकमध्ये पाहायला मिळते. पण, प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी अनुष्काने एक अतिशय साधा सूट निवडला होता. तिनं न्यूड बेज रंगाचा कुर्ता सेट परिधान केला होता, ज्यावर काळ्या रंगाच्या धाग्यांनी नाजूक भरतकाम करण्यात आलं होतं. त्यावर अगदी सटल मेकअप आणि मोकळे केस ठेवत अनुष्काने आपला लूक पूर्ण केला होता.
अभिनेत्रीने हा कुर्ता ऑर्गेन्झा फॅब्रिकपासून बनवलेल्या क्लासिक प्लाझोसोबत घातला होता, जी काळ्या रंगाच्या लेसने सजवलेली होती. यासोबत अनुष्काने स्कॅलॉप डिझाइनचा ओढणी घेतली होती. अभिनेत्रीचा हा कुर्ता सेट डिझायनर सुरीना चौधरी यांनी बनवला आहे आणि त्याची किंमत २८,९०० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक दर्जाची सेलिब्रिटी असणाऱ्या अनुष्का शर्माच्या स्टाईलची, तिच्या कपड्यांची आणि तिने घातलेल्या दागदागिन्यांची नेहमीच चर्चा असते.
अनुष्का शर्मा ३०० कोटींची मालकीण आहे. अनुष्का ही सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र सध्या ती बॉलिवूडपासून दुरावली आहे. २०१८ मध्ये ती झिरो चित्रपटात दिसली. हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटात कतरिना कैफ आणि शाहरुख देखील झळकले. तेव्हापासून अनुष्काने चित्रपटांपासून स्वतःला दूर केले आहे. तिने 'बुलबुल'ची निर्मिती केली आणि 'काला' चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती. अनुष्का 'चकदा एक्सप्रेस'मधून कमबॅक करणार असल्याचं बोललं जातं होतं. पण, तो चित्रपटही डब्बाबंद झाल्याची चर्चा आहे.