अनुष्का म्हणतेय,‘ पुरस्कारांवर विश्वास नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 11:59 IST2016-04-29T06:29:54+5:302016-04-29T11:59:54+5:30

‘सुल्तान’ मध्ये सल्लूमियाँसोबत काम करत असल्यामुळे अनुष्का शर्मा सध्या चांगलीच फॉर्मात आहे. तसेच तिचा करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल ...

Anushka says, 'There is no faith in the awards' | अनुष्का म्हणतेय,‘ पुरस्कारांवर विश्वास नाही’

अनुष्का म्हणतेय,‘ पुरस्कारांवर विश्वास नाही’

ुल्तान’ मध्ये सल्लूमियाँसोबत काम करत असल्यामुळे अनुष्का शर्मा सध्या चांगलीच फॉर्मात आहे. तसेच तिचा करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटही येऊ पाहत आहे. यात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे असतील.

तसेच ती तिच्या स्वत:च्या दिग्दर्शनाखाली ‘फिलौरी’ साठी काम करत आहे. याचे दिग्दर्शन ती कार्नेश शर्मासोबत करत आहे. एका मुलाखतीदरम्यान, अनुष्काला विचारण्यात आले की, ती एवढ्या लवकर तु निर्मितीक्षेत्रात का गेलीस?

तेव्हा ती म्हणाली,‘ सध्या माझ्या करिअरचा क्रीम काळ सुरू आहे. पण आपल्याकडे असे समजले जाते की, एखाद्या कलाकाराचे करिअर संपत आल्यावरवच त्याने निर्मिती क्षेत्राकडे वळावे. पण तसे नाही. तर मी या विचारांची आहे की, मला क्वालिटी चित्रपट बनवायचे आहेत. तसेच माझा पुरस्कारांवरही विश्वास नाहीये.

कारण मला कधीही पुरस्कारांची हाव नव्हती. मला फक्त उत्तम अभिनय, कथानक यावर आधारित चित्रपट साकारायचे आहेत. ‘एनएच 10’ ला मिळालेला प्रतिसाद पाहता मला अजून एक चित्रपट काढावासा वाटतोय. तो म्हणजे रोमँटिक, फनी असा ‘फिलौरी’!

Web Title: Anushka says, 'There is no faith in the awards'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.