​अनुष्कावर का रागावलायं सलमान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 19:20 IST2016-07-20T13:50:52+5:302016-07-20T19:20:52+5:30

सलमान खान व अनुष्का शर्मा यांच्या ‘सुलतान’ने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडत बॉक्स आॅफिसवर सुमारे ५०० कोटी रूपयांचा बिझनेस केला. ...

Anushakkara ka Raagawala Salman? | ​अनुष्कावर का रागावलायं सलमान?

​अनुष्कावर का रागावलायं सलमान?

मान खान व अनुष्का शर्मा यांच्या ‘सुलतान’ने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडत बॉक्स आॅफिसवर सुमारे ५०० कोटी रूपयांचा बिझनेस केला. ‘सुलतान’चे निर्माते या यशाने जाम खूश आहेत. पण ‘सुलतान’ म्हणजेच सलमान खान मात्र काहीसा नाराज आहे. होय, सलमान अनुष्कावर काहीसा रागावलायं.   ‘रेप्ड वूमन’ वादावर अनुष्काने दिलेली प्रतिक्रिया सलमानला काही रूचली नाही. त्यामुळेच तो अनुष्कावर नाराज असल्याचे कळते. अलीकडे एका शोमध्ये सलमानची को-स्टार असलेल्या अनुष्काने सलमानच्या ‘रेप्ड वूमन’ वादावर बेधडक प्रतिक्रिया दिली होती. सलमानचे हे वक्तव्य असंवेदनशील होते. सलमान असे का बोलला मला ठाऊक नाही. पण तो जे काही बोलला ते ऐकून मी हैरान झाले, असे अनुष्का या शोमध्ये म्हणाली होती. मी सलमानसोबत केवळ एकच चित्रपट केलाय. त्यामुळे मी फारसे त्याला ओळखत नाही,असेही तिने म्हटले होते..आता सलमानचा राग अनुष्का दूर करते की त्याकडे दुर्लक्ष करते, ते बघूच!!

Web Title: Anushakkara ka Raagawala Salman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.