अति मद्यपानामुळे हॉस्पिटलमध्ये भरती; सिगारेट्स, दारू अन् ड्रग्जच्या व्यसनाबद्दल अनुषा म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:50 IST2025-10-15T12:50:10+5:302025-10-15T12:50:54+5:30
अति मद्यपानामुळे एकदा हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागल्याचा धक्कादायक खुलासा अनुषानं केलाय. तसेच तिने सिगारेट्स, दारू आणि ड्रग्ज यांसारख्या व्यसनांवर स्पष्ट मत मांडले.

अति मद्यपानामुळे हॉस्पिटलमध्ये भरती; सिगारेट्स, दारू अन् ड्रग्जच्या व्यसनाबद्दल अनुषा म्हणाली...
Anusha Dandekar : फॅशन आयकॉन अनुषा दांडेकर ही अनेक तरुणांची क्रश आहे. अनुषा दमदार अभिनयाबरोबरच तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. अनुषाच्या अदांवर चाहतेही फिदा होता. कमालीचा फिटनेस आणि लूकमुळे ती कायमच चर्चेत असतो. पण, सध्या अनुषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अनुषाला अति मद्यपानामुळे एकदा हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं होतं, असा धक्कादायक खुलासा तिनं केलाय. तसेच तिने सिगारेट्स, दारू आणि ड्रग्ज यांसारख्या व्यसनांवर स्पष्ट मत मांडले.
अनुषानं नुकतंच अभिनेत्री प्रियंका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा यांच्याशी संवाद साधला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांना काही अशा सवयी आहेत, ज्या आरोग्य, मानसिक स्थिती आणि करिअरसाठी योग्य नाहीत. पण, असेही काही लोक आहेत, जे त्या गोष्टींपासून दूर राहतात. तर तुला इंस्ट्रीत आल्यावर काही वाईट सवयी लागल्या का? यावर अनुष्का म्हणाली, "मला अशा कुठल्याच सवयी नाही आहेत. डाएट कोकचं एकेकाळी मी अति प्रमाणात सेवन केलं होतं आणि ती माझी खूप वाईट सवय होती. मी माझ्या आई-वडिलांना याचं श्रेय देते, त्यांची मी आभारी आहे की, त्यांनी मला कायम स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे मला कधीच चुकीच्या गोष्टी कराव्या वाटल्या नाहीत".
यावेळी अनुषानं दारूचं सेवन करण्याबद्दलही सांगितलं आहे. ती म्हणाली, "मी एकदा १४ वर्षांची असताना खूप दारू प्यायले होते. मला वाटलेलं की, ते फळांपासून बनलं आहे आणि मला त्याची चव खूप आवडली होती. त्यामुळे मी पूर्ण दारूची बाटली संपवली. पण, त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. तेव्हा नर्सनं माझ्या वडिलांना तिला ओरडू नका, ती पुन्हा कधीच दारू पिणार नाही, असं सांगितलेलं".
ड्रग्जबद्दल अनुषा म्हणाली, "मला माझ्या आयुष्यात कधीच ड्रग्जचं सेवन करायचं नव्हतं. कधीच केलं नाही. खरं तर माझं स्वत:वर नियंत्रण नाहीये. माझं स्वत:वरचं नियंत्रण सुटलं की, मी काहीही करू शकते म्हणून मी त्या गोष्टींपासून दूर राहते. मी लहान असताना माझ्या वडिलांना सतत सिगारेट ओढताना पाहिलं आहे. तेव्हा मला अस्थमा होता. त्यामुळेही मला या गोष्टींचं सेवन करायचं नव्हतं. पण मी सिगारेट्स ओढल्या आहेत. मला त्याचा वास अजिबात आवडत नाही".
ऑस्ट्रेलियाहून मुंबईत स्थायिक झाल्याबद्दल अनुषा म्हणाली, "मी २० वर्षांची असताना भारतात आले होते. त्यावेळी मी काहीही चुकीच्या गोष्टी करु शकले असते. पण, सगळं उलटं झालं. मी खूप जबाबदार झाले. मी घर खरेदी केलं. मला एमटीव्हीमध्ये नोकरी मिळाली होती. त्या गोष्टीला मी कधीच गृहीत धरलं नाही. मला माहित नाही की माझ्यात खूप चांगले, योग्य निर्णय घेण्याचे संस्कार रुजवले गेले होते. म्हणून मी कधीच चुकीच्या गोष्टी केल्या नाही. मी सारखी सक्रीय असल्यानं सर्वजण माझ्या मॅनेजरला विचारायचे ही काय खाते".