अनुराग कश्यप यांचे ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे..’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 19:38 IST2016-07-15T14:08:19+5:302016-07-15T19:38:19+5:30
प्रेम कितीही लपवलं, तरी लपत नाही, असे म्हटले जाते. नामांकित डायरेक्टर-प्रोड्यूसर अनुराग कश्यप यांच्याही बाबतीत काहीसे असेच म्हणता येईल. ...

अनुराग कश्यप यांचे ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे..’
प रेम कितीही लपवलं, तरी लपत नाही, असे म्हटले जाते. नामांकित डायरेक्टर-प्रोड्यूसर अनुराग कश्यप यांच्याही बाबतीत काहीसे असेच म्हणता येईल. दोन लग्न तुटल्यानंतर अनुराग पुन्हा कुणाच्या तरी प्रेमात पडले आहेत. अर्थात हे प्रेम लपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण प्रेम लपणार कसे..?? विश्वास बसत नसेल, तर हा फोटो तुम्ही पाहू शकता. यात अनुराग त्यांची कथित गर्लफ्रेन्ड शुभ्रा शेट्टी हिला किस करताना दिसत आहेत. दोघांच्याही वयात बरेच अंतर आहे. पण प्रेमात वयाला महत्त्व नाहीत. अनुराग ४३ वर्षांचे तर शुभ्रा केवळ २२ वर्षांची आहे. अनुराग व शुभ्राचा हा फोटो न्यूयॉर्कमधला असल्याचे सांगितले जात आहे. शुभ्राच्या एका जवळच्या मैत्रिणीने इंस्टाग्रामवर हा पोस्ट केला. केवळ एवढेच नाही तर या फोटोला कॅप्शन दिले, ‘माय लीटल लव्हबर्ड्स’...आयी बात कुछ समझ में...!!