Watch Video : क्लिनिकबाहेर पापाराझींना पाहुन अनुराग कश्यपची सटकली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 14:35 IST2019-05-07T14:34:04+5:302019-05-07T14:35:12+5:30
अनुराग कश्यप डॉक्टरांना भेटण्यासाठी एका क्लिनिकमध्ये गेला होता. पण तो पोहोचण्यापूर्वी पापाराझी तिथे हजर होते. अनुरागला पाहून पापाराझींचे कॅमेरे सरसावले आणि हे सगळे बघून अनुरागची सटकली.

Watch Video : क्लिनिकबाहेर पापाराझींना पाहुन अनुराग कश्यपची सटकली!
बॉलिवूड आणि पापाराझी यांचे एक आगळे-वेगळे नाते आहे. बॉलिवूड स्टार्सची स्टाईल आणि त्यांच्याशी संबधित ताज्या बातम्या, गॉसिप्स चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यात पापाराझी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी नाही-नाही तो खटाटोप करतात. साहजिकच अनेकदा हा खटाटोपमहागात पडतो आणि पापाराझींना सेलिब्रिटींच्या संतापाचा सामना करावा लागतो. अगदी अलीकडे पापाराझींना दिग्दर्शक अनुराग कश्यपचा संताप सहन करावा लागला.
अनुराग कश्यप डॉक्टरांना भेटण्यासाठी एका क्लिनिकमध्ये गेला होता. पण तो पोहोचण्यापूर्वी पापाराझी तिथे हजर होते. अनुरागला पाहून पापाराझींचे कॅमेरे सरसावले आणि हे सगळे बघून अनुरागची सटकली. मग काय, तुम्ही इथे डॉक्टरच्या क्लिनिकबाहेर काय करताय? तुमच्याकडे दुसरे काही काम नाही का? अशा प्रश्नांची सरबत्ती त्याने सुरु केली. त्याच्या या प्रश्नांवर, हे आमचे काम आहे, असे उत्तर एका फोटोग्राफरने दिले. मग तर अनुराग आणखीच भडकला.
तुम्ही हे काम करता? तुम्ही काय करता, हे जरा स्वत:ला विचारा, आयुष्यात काही चांगले करण्याबद्दल विचार करा, असे अनुराग यावर म्हणाला. याठिकाणी हजर असलेल्या एका फोटोग्राफरने याचा व्हिडीओ शेअर केला. सोबतच अनुरागसाठी एक मॅसेजही लिहिला.
‘अनुराग कश्यप, तू आम्हाला आमच्या कामाबद्दल मत देऊ नकोस. आमच्या व्यवसायाबद्दल बोलायचा तुला काही एक अधिकार नाही. संपूर्ण इंडस्ट्रीला आमच्या कामाचा अभिमान आहे, ’असे या फोटोग्राफरने लिहिले. अद्याप अनुरागने या मॅसेजला उत्तर दिलेले नाही. पण शांत बसण्याचा अनुरागचा स्वभाव नाहीच. त्यामुळे यशावकाश तो यावर काय उत्तर देतो ते बघूच.