File No 323 ! अनुराग कश्यप साकारणार विजय माल्याची भूमिका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 01:50 PM2022-11-08T13:50:34+5:302022-11-08T13:50:58+5:30

Anurag Kashyap as Vijay Mallya: एसबीआयसह जवळपास डझनभर बड्या बँकांची कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये आश्रय घेणारा फरार उद्योजक विजय माल्यावर आता एक सिनेमा बनतोय. या सिनेमाचं नाव आहे, ‘फाइल नंबर 323’...

Anurag Kashyap in talks to play Vijay Mallya in File No 323 | File No 323 ! अनुराग कश्यप साकारणार विजय माल्याची भूमिका!!

File No 323 ! अनुराग कश्यप साकारणार विजय माल्याची भूमिका!!

googlenewsNext

File No 323: एसबीआयसह जवळपास डझनभर बड्या बँकांची कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये आश्रय घेणारा फरार उद्योजक विजय माल्या (Vijay Mallya), नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्यावर आता एक सिनेमा बनतोय. या सिनेमाचं नाव आहे, ‘फाइल नंबर 323’. तामिळ दिग्दर्शक शंकर यांना अनेक वर्ष अस्टिस्ट करणारा दिग्दर्शक कार्तिक के या चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय. कार्तिकचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा असणार आहे.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच या चित्रपटाचं शूटींग सुरू होणार आहे. हा बिग बजेट सिनेमा पुढील वर्षी रिलीज होईल. भारतातून फरार झालेला विजय माल्या युरोपात लॅव्हिश आयुष्य जगतोय. त्याचं हे लॅव्हिश आयुष्य चित्रपटात दाखवलं जाईल. साहजिकच युरोपच्या अनेक भागांत चित्रपटाचं शूटींग होईल. आता या चित्रपटात विजय माल्याची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

तर विजय माल्याची भूमिका दिग्दर्शक व अभिनेता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) साकारणार असल्याची चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर माल्याच्या भूमिकेसाठी अनुराग कश्यपचं नाव फायनल झालं आहे. अद्याप अनुरागने हा सिनेमा साईन केलेला नाही. पण लवकरच तो हा सिनेमा साईन करेल, असं मानलं जात आहे. या चित्रपटासाठी अनुरागच्या लूकमध्ये बदल करण्यात येणार आहे.  

गँग्स ऑफ वासेपूर, रमन राघव, ब्लॅक फ्रायडेसारखे सिनेमे देणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप एक अभिनेताही आहे. अनेक चित्रपटांत त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अकीरा, धूमकेतू, मुक्काबाज अशा अनेक चित्रपटांत तो अभिनय करताना दिसला आणि प्रत्येक चित्रपटात त्याने पब्लिकला इम्प्रेस केलं. पण आता कदाचित अनुरागला त्याचं बेस्ट द्यायचं आहे आणि माल्याची भूमिका ही त्याच्यासाठी मोठी संधी आहे.

फाइल नंबर 323 या चित्रपटात नीरव मोदी व मेहुल चोकसीची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप ठरेलेलं नाही. पण या नावांचा खुलासाही लवकरच होणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दोबारा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे.  

Web Title: Anurag Kashyap in talks to play Vijay Mallya in File No 323

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.