"मला छावा सिनेमा आवडला नाही!"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाला- "विकीने आता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 11:03 IST2025-09-21T11:02:18+5:302025-09-21T11:03:22+5:30

अनुराग कश्यपने छावा सिनेमा पाहून त्याचं मत व्यक्त केलंय. याशिवाय अनुरागने विकीवर काहीशी नाराजी व्यक्त केली आहे

Anurag Kashyap didnt like chhaava movie and not in contact with vicky kaushal | "मला छावा सिनेमा आवडला नाही!"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाला- "विकीने आता..."

"मला छावा सिनेमा आवडला नाही!"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाला- "विकीने आता..."

अनुराग कश्यप हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक. अनुरागने बॉलिवूड सिनेमे पाहून त्याचं मत व्यक्त करत असतो. अशातच अनुरागने 'छावा' सिनेमा पाहून त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. अनुरागने विकी कौशलबद्दलही काहीशी नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ''मी आता विकीच्या संपर्कात नाही'', असंही त्याने सांगितलं आहे. काय म्हणाला अनुराग? जाणून घ्या.

अनुरागने 'छावा' बद्दल केलं मोठं विधान 

अनुरागने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी 'छावा'चा काही भाग पाहिला. विशेषतः शेवटचा अत्याचाराचा सीन, तोही केवळ माझा मित्र विनीत कुमार सिंह या चित्रपटात आहे म्हणून मी पाहिला. हा चित्रपट भावनिकदृष्ट्या मला त्रासदायक वाटला. वेदना आणि दुःखातून भावना निर्माण करण्याचा प्रयत्न मला आवडला नाही. मला 'छावा' सिनेमा 'द पॅशन ऑफ द ख्राइस्ट'सारखा वाटला. मला आवडला नाही."

विकीबद्दल काय म्हणाला अनुराग?

अनुरागने सांगितलं की, ''छावा सिनेमा मी पूर्ण पाहू शकलो नाही आणि अशा प्रकारचे हिंदी चित्रपट पाहणं मी आता जवळपास बंद केलं आहे. मी आता फक्त 'धडक २', 'लापता लेडीज' आणि 'चमकीला' सारखे मोजके चित्रपट पाहिले आहेत. आजकाल मी विकी कौशलशी बोलत नाही. विकीने स्टारडमचा रस्ता निवडला आणि यासाठी मी त्याला दोषी मानत नाही, कारण प्रत्येकाची स्वतःची कारणं असतात. मी जे काही बोलतो ते पुन्हा सांगत नाही. त्यामुळे जे काही सांगायचं होतं, ते मी सांगितलं आहे.'' अशा शब्दात अनुरागने विकीबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Anurag Kashyap didnt like chhaava movie and not in contact with vicky kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.