गजब! 67 वर्षांच्या अनुपम खेर यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:10 IST2022-04-18T13:08:26+5:302022-04-18T13:10:08+5:30

Anupam Kher Body Transformation : होय, 67 वर्षांच्या अनुपम यांनी जे काही केलंय ते पाहून सगळेच थक्क आहेत.  त्यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून क्षणभर तुमचाही विश्वास बसणार नाही.

anupam kher share his body transformation photo | गजब! 67 वर्षांच्या अनुपम खेर यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

गजब! 67 वर्षांच्या अनुपम खेर यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

Anupam Kher Body Transformation  :  अनुपम खेर (Anupam Kher) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असतात. पण सध्या एका वेगळ्याच कारणानं त्यांची चर्चा होतेय. होय, 67 वर्षांच्या अनुपम यांनी जे काही केलंय ते पाहून सगळेच थक्क आहेत.  त्यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून क्षणभर तुमचाही विश्वास बसणार नाही.

गेल्या महिन्यातच अनुपम यांनी 67 वा वाढदिवस साजरा केला. मात्र या वयातही त्यांचा फिटनेस तरूणांना लाजवेल असा आहे. नुकताच त्यांनी एक फोटो पोस्ट केला. जुन्या आणि नव्या फोटोच्या या कोलाजमध्ये त्यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळतंय.

एका बाजूला त्यांचा जुना फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला आत्ताचा फिट अ‍ॅण्ड फाईन फोटो आहे. या फोटोला त्यांनी दिलेलं कॅप्शनही प्रेरणादायी आहे. ‘आहे तसंच राहण्याच्या इच्छेपेक्षा सतत बदलत राहण्याची इच्छा मोठी असायला हवी. फिटनेसची सुरूवात जिममध्ये डंबलसने होत नाही तर तुमच्या ठाम विचाराने होते. निर्णय घेण्यासाठी आजचाच दिवस चांगला आहे,’असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. कुछ भी हो सकता है, बॉडी ऑफ द इअर असे दोन हॅशटॅगही त्यांनी दिले आहेत. याआधी अनुपम यांनी वर्कआऊटचे फोटो व व्हिडीओ शेअर केले होते.

फॅन्स म्हणाले...
अनुपम यांचा हा अंदाज पाहून चाहते थक्क आहेत. या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. आणखी एक मिलिंद सोमन, अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे. गजब, तुम्ही तर कमाल केली, असं एकाने लिहिलं आहे. एकाने तर तुमचा हा फोटो ट्रान्सफॉर्मेशनच्या जाहिरातीसाठी द्या, असा सल्ला दिला आहे. तुम्ही हिट होताच आता फिटही झालात, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे.
अनुपम यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच त्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच ते ‘उंचाई’ या सिनेमात झळकणार आहेत.

Web Title: anupam kher share his body transformation photo