-तर ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगँबोची भूमिका, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 16:45 IST2019-06-23T16:44:37+5:302019-06-23T16:45:41+5:30

‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झालीत. पण आजही हा चित्रपट आठवला की, यातील ‘मोगँबो खूश हुआ’ हा डायलॉग हमखास आठवतो. अमरीश पुरी यांनी ‘मिस्टर इंडिया’तील मोगँबो ही आयकॉनिक भूमिका साकारली होती.

anupam kher reveals not amrish puri he was the first choice to play mogambo in mr india | -तर ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगँबोची भूमिका, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

-तर ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगँबोची भूमिका, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

ठळक मुद्देअनुपम यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा ‘वन डे-जस्टिस डिलीवर्ड’हा सिनेमा येत्या २८ जूनला प्रदर्शित होतोय.

‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झालीत. पण आजही हा चित्रपट आठवला की, यातील ‘मोगँबो खूश हुआ’ हा डायलॉग हमखास आठवतो. अमरीश पुरी यांनी ‘मिस्टर इंडिया’तील मोगँबो ही आयकॉनिक भूमिका साकारली होती. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात अमरीश पुरी यांनी साकारलेल्या या भूमिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. यामधील त्यांचा ‘मोगँबो खुश हुआ’ हा संवाद प्रचंड गाजला. पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की, ‘मिस्टर इंडिया’तील मोगँबोची ही भूमिका आधी अनुपम खेर यांना ऑफर झाली होती.

होय, अलीकडे ‘वन डे जस्टिस डिलीवर्ड’ या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान खुद्द अनुपम यांनीच हा खुलासा केला. मोगँबोची भूमिका अमरीश पुरी यांच्याआधी मला ऑफर झाली होती. पण एक-दोन महिन्यांत मेकर्सनी माझ्याजागी अमरीश पुरी यांना घेतले, असे अनुपम यावेळी म्हणाले.

चित्रपटातून काढल्यानंतर कुण्याही कलाकाराला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मलाही त्यावेळी वाईट वाटले होते. पण ‘मिस्टर इंडिया’मधील अमरीश पुरी यांचे काम पाहिल्यानंतर मेकर्सनी माझ्याजागी त्यांना घेऊन अगदी योग्य निर्णय घेतला, असे मला वाटले होते, असेही त्यांनी सांगितले.
रसिकांच्या मनात अनुपम खेर यांचे वेगळे स्थान आहे. ‘सांराश’ सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अनुपम खेर यांचा जीवनप्रवास कधीच सोपा नव्हता. मात्र ‘सांराश’सिनेमानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अभिनयामुळे त्यांनी रसिकांची मने जिंकली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.


अनुपम यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा ‘वन डे-जस्टिस डिलीवर्ड’हा सिनेमा येत्या २८ जूनला प्रदर्शित होतोय. यात त्यांच्यासोबत ईशा गुप्ता लीड भूमिकेत आहे.

Web Title: anupam kher reveals not amrish puri he was the first choice to play mogambo in mr india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.