"माझे फेव्हरेट रोमँटिक सहकलाकार...", अनुपम खेर यांच्याबरोबरचा 'तो' फोटो शेअर करत रितेशची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 18:29 IST2024-03-07T18:29:36+5:302024-03-07T18:29:53+5:30
Anupam Kher Birthday : अनुपम खेर यांना रितेश देशमुखने हटके अंदाजात केलं बर्थडे विश, 'अपना सपना मनी मनी'मधील तो फोटो शेअर करत म्हणाला...

"माझे फेव्हरेट रोमँटिक सहकलाकार...", अनुपम खेर यांच्याबरोबरचा 'तो' फोटो शेअर करत रितेशची पोस्ट
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते असलेल्या अनुपम खेर यांचा आज वाढदिवस आहे. अनुपम हे गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. 'दिल', 'द काश्मीर फाइल्स', 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे', 'द व्हॅक्सीन वॉर', 'हम आपके है कौन', 'विवाह', 'सूर्यवंशम' अशा अनेक सुपरहिट सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. गंभीर भूमिकांबरोबरच अनुपम यांनी विनोदी भूमिकाही बखुबीने साकारल्या. आज त्यांच्या वाढदिवशी चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेता रितेश देशमुखनेहीअनुपम खेर यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवरुन एक खास पोस्ट शेअर केली आहे. रितेश आणि अनुपम यांनी अपना सपना मनी मनी या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमातील एक फोटो त्याने शेअर केला आहे. "माझे फेव्हरेट रोमँटिक सहकलाकार...तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा." असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
'अपना सपना मनी मनी' सिनेमात रितेश देशमुख किशनच्या भूमिकेत होता. यामध्ये त्याने स्त्री पात्र ही साकारलं होतं. तर अनुपम खेर यांनी या सिनेमात सत्यबोल शात्री ही भूमिका साकारली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा गाजला होता. दरम्यान, अनुपम खेर आता कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.