अनुप जलोटा यांची FTIIच्या संचालकपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 20:00 IST2018-09-26T20:00:22+5:302018-09-26T20:00:43+5:30
'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (FTII) संचालकपदी गझल व भजन गायक अनुप जलोटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अनुप जलोटा यांची FTIIच्या संचालकपदी नियुक्ती
'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (FTII) संचालकपदी गझल व भजन गायक अनुप जलोटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूचनांनुसार जलोटा यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
‘एफटीआयआय सोसायटी’वर चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत, ज्येष्ठ अभिनेते डॅनी डॅन्झोप्पा, अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्यासह अनेक नामवंतांचा समावेश आहे. ‘एफटीआयआय सोसायटी’ आणि नियामक मंडळ तसेच शैक्षणिक परिषदेच्या नियुक्त्या गेल्या वर्षभरापासून रखडल्या होत्या. ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती झाल्यानंतर अकरा महिन्यांनी या नियुक्त्या झाल्या आहेत. मात्र निवड प्रक्रिया उशीरा झाल्यामुळे यांच्याकडे कार्यभार फक्त अठरा महिन्यांसाठी राहणार आहे.