अर्जुन कपूरच्या बहिणीने कोरियामध्ये सेलिब्रेट केली बॅचलर्स पार्टी, अंशुलाचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:33 IST2026-04-03T11:32:11+5:302026-04-03T11:33:11+5:30
Anshula kapoor: अंशुला लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या तिच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे.

अर्जुन कपूरच्या बहिणीने कोरियामध्ये सेलिब्रेट केली बॅचलर्स पार्टी, अंशुलाचे फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. अर्जुनच्या घरी त्याची धाकटी बहीण अंशुला हिच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. यामध्येच अंशुलाने तिची बॅचलर्स पार्टी सेलिब्रेट केली. विशेष म्हणजे अंशुलाने थेट साऊथ कोरियामध्ये जाऊन तिचं ब्राइड टू बीचं सेलिब्रेशन केलं आहे. तिच्या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बोनी कपूर यांची लेक अंशुला लवकरच रोहन ठक्कर याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे लग्नापूर्वी ती तिच्या गर्लगँगसोबत लग्नापूर्वीचे दिवस एन्जॉय करतीये. अंशुलाने इन्स्टाग्रामवर तिचे साऊथ कोरियामधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती साऊथ कोरियाची राजधानी सोल इथे फिरतांना दिसत आहे.
कायमसोबत असणारा सोलमधील मित्रपरिवार. माझ्या जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत बॅचलरेटची मस्ती, असं कॅप्शन अंशुलाने या फोटोला दिलं आहे. अंशुलाने या पोस्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो शेअर केले आहेत. यात तिचा कूल अंदाजही दिसून येत आहे.
अंशुलाच्या मित्रपरिवाराने तिची बॅचलरेट पार्टी आयोजित केली होती. यावेळी त्यांनी तिच्यासाठी खास डेकोरेशन केलं होतं. तसंच अंशुलाच्या आवडीचे पदार्थही त्यांनी जेवणात ठेवले होते.