जान्हवी कपूरला या खास व्यक्तीने दिले वाढदिवसाचे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 17:40 IST2019-03-07T17:39:13+5:302019-03-07T17:40:28+5:30

जान्हवीला सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तिची चुलत बहीण सोनम कपूरने तर तिचा लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता तर अर्जुनने कॉफी विथ करण या कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेला फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या.

anshula kapoor give surprise to janhvi kapoor | जान्हवी कपूरला या खास व्यक्तीने दिले वाढदिवसाचे सरप्राईज

जान्हवी कपूरला या खास व्यक्तीने दिले वाढदिवसाचे सरप्राईज

ठळक मुद्देमुंबईला घरी आल्यावर तिला तिची रूम पूर्णपणे फुग्यांनी सजलेली दिसली. तिची रूम तिची बहीण अंशुलाने सजवली होती. जान्हवीनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट तिच्या फॅन्सना सांगितली आणि अंशुलाचे धन्यवाद मानले. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर हिचा नुकताच वाढदिवस झाला. वयाची २२ वर्षं पूर्ण करणारी जान्हवी आजही आईच्या अकाली मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेली नाही. गतवर्षी जान्हवीच्या वाढदिवसाच्या दहा दिवसांपूर्वी श्रीदेवींनी जगाचा निरोप घेतला होता. जान्हवीसाठी हा मोठा धक्का होता. आज श्रीदेवी आपल्यात नाहीत. पण जान्हवीत श्रीदेवी यांची झलक कायम दिसत राहिल. गतवर्षी जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मधून जान्हवीने डेब्यु केला. लवकरच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘तख्त’ या मल्टीस्टारर चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. 

जान्हवीचा वाढदिवस तिच्या भावंडांनी म्हणजेच खुशी कपूर, अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर यांनी खूपच चांगल्या प्रकारे साजरा केला. वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूर सोबत जान्हवीने वाराणसीला जाऊन काशी विश्वनाथच्या देवळात पाया पडल्या. सध्या ती वाराणसीमध्ये गंजुन सक्सेनाच्या बायोपिकवर काम करत आहे. वाराणसीला तिने केक कापून वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन देखील केले. विशेष म्हणजे तिने केक तलवारीलने कापला. जान्हवी वाराणसीच्या सेलिब्रेशननंतर मुंबईला पोहोचली. तिथे तिला खूप छान सरप्राईज मिळाले. मुंबईला घरी आल्यावर तिला तिची रूम पूर्णपणे फुग्यांनी सजलेली दिसली. तिची रूम तिची बहीण अंशुलाने सजवली होती. जान्हवीनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट तिच्या फॅन्सना सांगितली आणि तिची रूम सजवल्याबद्दल आणि तिच्यासाठी पार्टी आजोजित केल्याबद्दल अंशुलाचे धन्यवाद मानले. 

जान्हवीला सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तिची चुलत बहीण सोनम कपूरने तर तिचा लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता

तर अर्जुनने कॉफी विथ करण या कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेला फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या.

जान्हवीला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल तिने तिच्या फॅन्सचे देखील आभार मानले आहेत. तिने तिचा एक छानसा फोटो इन्टाग्रामवर पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, तुम्ही मला दिलेल्या प्रेमासाठी मी तुमची आभारी आहे. 
 

Web Title: anshula kapoor give surprise to janhvi kapoor