आणखी एक कपूर बी-टाऊनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 13:01 IST2016-05-16T07:31:46+5:302016-05-16T13:01:46+5:30

अनिल कपूर यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचा लेक हर्षवर्धन सज्ज आहे.. गेल्या 4 दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर ...

Another Kapoor in B-Town | आणखी एक कपूर बी-टाऊनमध्ये

आणखी एक कपूर बी-टाऊनमध्ये

िल कपूर यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचा लेक हर्षवर्धन सज्ज आहे.. गेल्या 4 दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन यांच्या स्वागतासाठी बॉलीवुडसुद्धा तयार आहे. हर्षवर्धनच्या ग्रँड बॉलीवुड लॉन्चिंगसाठी राकेश ओमप्रकाश मेहरा घेऊन येत आहेत 'मिर्जिया' ही अनोखी लवस्टोरी. हा सिनेमा 7 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येतोय. हर्षनं सुरुवातीपासून सिनेमात रस घेत त्याचं ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली होती. सिनेमाची हर्षवर्धनला चांगली जाण आहे. त्यामुळंच हर्षच्या सांगण्यावरुन अनिल कपूर यांनी 'स्लमडॉग मिलेनियर' आणि 'दिल धडकने दो' हे सिनेमा साईन केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं आता सिनेमाची एवढी चांगली जाण असलेला हर्ष हा अनिल कपूर यांचं नाव कशारितीने उंचावतो हे 'मिर्जिया' रिलीज झाल्यानंतरच कळेल.

Web Title: Another Kapoor in B-Town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.