​प्रियंकाच्या हाती आणखी एक हॉलिवूडपट??

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 21:49 IST2016-05-27T16:02:53+5:302016-05-27T21:49:05+5:30

अमेरिकेच्या प्राईम टाईम शोमध्ये हजेरी लावणारी, हॉलिवूडपटांपर्यंत झेप घेणारी आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा काल भारतात परतली. हॉलिवूड प्रोजेक्टमुळे ...

Another Hollywood movie in Priyanka? | ​प्रियंकाच्या हाती आणखी एक हॉलिवूडपट??

​प्रियंकाच्या हाती आणखी एक हॉलिवूडपट??

ेरिकेच्या प्राईम टाईम शोमध्ये हजेरी लावणारी, हॉलिवूडपटांपर्यंत झेप घेणारी आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा काल भारतात परतली. हॉलिवूड प्रोजेक्टमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रियंका विदेशात होती. ‘क्वान्टिको’ या अमेरिकन शोनंतर पीसीला ‘बेवॉच’ हा हॉलिवूडपट मिळाला. याचे शूटींग संपवून प्रियंका भारतात परतली. पण हे काय, आता पुन्हा एक हॉलिवूड प्रोजेक्ट प्रियंकाची प्रतीक्षा करीत असल्याची खबर आहे. होय,‘बेवॉच’च्या मेकर्सनीच प्रियंकाला आपल्या दुसºया नव्या प्रोजेक्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. या नव्या प्रोजेक्टमध्ये प्रियंका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचेही कळते. प्रियंका लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूयात!!

Web Title: Another Hollywood movie in Priyanka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.