बॉलिवूडला आणखी एक धक्का, अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 16:55 IST2021-04-03T16:55:18+5:302021-04-03T16:55:38+5:30

तारिक शाह यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Another blow to Bollywood, actor and director Tariq Shah passed away | बॉलिवूडला आणखी एक धक्का, अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का, अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन

बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. अभिनेते व दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन झाले आहे. तारिक यांनी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तारिक शाह अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती होते आणि त्यांना 'कडवा सच' मालिका आणि 'जन्म कुडंली' या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार तारिक शाह मागील दोन वर्षांपासून मुत्रपिंडाच्या समस्येशी सामना करत होते. मागील काही दिवसांपासून ते डायलिसिसवर होते. तारिक शाह यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.


तारिक शाह दिग्दर्शक आणि निर्मातेदेखील होते. त्यांनी जन्म कुंडली, बहार आने तक यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. बाहर आने तकमध्ये तारिक शाहशिवाय रुपा गांगुली, सुमित सहगल, मुुनमुन सेन आणि नवीन निश्चल यासारखे कलाकार होते. याशिवाय त्यांनी कडवा सचचेदेखील दिग्दर्शन केले होते. त्यांनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९८० या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेंद्र सिंग आतिशने केले होते.
तारिक शाह यांनी शोमा आनंद यांच्यासोबत लग्न केले जेव्हा त्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होत्या. लग्नानंतर शोमा यांना कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नाही आणि त्या चित्रपटांपासून दुरावल्या. लग्नानंतर शोमा आनंद यांनी एका मुलीला जन्म दिला जिचे नाव सारा शाह आहे. 
तारिक शाह बऱ्याच काळापासून सिनेइंडस्ट्रीमधून गायब आहेत. मात्र त्यांची पत्नी शोमा आजही इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तारिक यांच्यासोबत लग्न केल्यानंतर शोमा यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाउल टाकले. हम पांच या मालिकेतून पुन्हा कामाला सुरूवात केली आणि इथून त्यांच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट आला. त्यानंतर पुन्हा त्यांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केले आणि बऱ्याच भूमिका केल्या.

Web Title: Another blow to Bollywood, actor and director Tariq Shah passed away