​‘उडता पंजाब’ला आणखी मोठा धक्का??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 20:14 IST2016-06-05T14:42:36+5:302016-06-05T20:14:12+5:30

‘उडता पंजाब’ हा चित्रपट म्हणजे यावर्षांतील सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट म्हटल्यास खोटे ठरणार नाही.चित्रपट पाहिल्यानंतर न्यायाधिकरणाने चित्रपटाच्या नावातून ‘पंजाब’ हा शब्द गाळण्यात यावा, अशी शिफारस केल्याचे कळते. एवढेच नाही तर चित्रपटातून पंजाबशी निगडीत सर्व संदर्भ हटविण्यात यावे, असेही न्यायाधिकरणाचे मत पडले

Another big push for 'Flying Punjab' | ​‘उडता पंजाब’ला आणखी मोठा धक्का??

​‘उडता पंजाब’ला आणखी मोठा धक्का??

डता पंजाब’ हा चित्रपट म्हणजे यावर्षांतील सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट म्हटल्यास खोटे ठरणार नाही. सेन्सॉरबोर्डाच्या कात्रीत अडकलेल्या या  चित्रपटाचे सह-निर्माते अनुराग कश्यप चांगलेच वैतागले आहेत. सेन्सॉरबोर्डाच्या आक्षेपामुळे चित्रपटातील ४० दृश्यांना कात्री लावण्यात आल्यानंतर अनुराग कश्यप यांनी न्यायाधिकरण तसेच माहिती व प्रसारण मंत्र्यांकडे यामुद्यावर मध्यस्थी करण्याची गळ घातली होती. त्यानुसार न्यायाधिकरणासाठी अलीकडे चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. चित्रपट पाहिल्यानंतर न्यायाधिकरणाने चित्रपटाच्या नावातून ‘पंजाब’ हा शब्द गाळण्यात यावा, अशी शिफारस केल्याचे कळते. एवढेच नाही तर चित्रपटातून पंजाबशी निगडीत सर्व संदर्भ हटविण्यात यावे, असेही न्यायाधिकरणाचे मत पडले. एवढे कमी की काय, तर आता या चित्रपटाच्या गाण्यांवरही आक्षेप नोंदवण्यात आल्याची नवी आली आहे. ‘चिट्टा वे...’ या चित्रपटाच्या टायटल साँगवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला असल्याची बातमी आहे. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘चिट्टा वे..’गाण्यातील ‘चिट्टा’ शा शब्दाचा अर्थ पांढरा असा होता. कथितरित्या ‘कोकेन’च्या संदर्भाने हा शब्द वापरण्यात आला आहे. सेन्सॉरबोर्डाने या शब्दावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे हे गाणे कदाचित चित्रपटातून गाळण्यात येईल, अशी शक्यता आहे. केवळ हेच नाही तर ‘paidaishi h****i’ या शब्दांच्या वापरावरही सेन्सॉरबोर्डाने आक्षेप घेतला आहे.



सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर शाहीदची प्रतिक्रिया...
हे गाणे आधीच आऊट झाले आहे. सेन्सॉर बोर्डामधील काही मोजक्या व्यक्ती ग्लोबल सिनेमा पाहणाºया आहेत. चित्रपटातील दृश्ये,शब्द हे कथेच्या संदर्भाने आले आहेत. त्याचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. हे संदर्भच गाळले तर चित्रपटालाच अर्थ उरणार नाही. जे गाणे आधीच इंटरनेट, टीव्ही, फोनवर आहे. ते गाणे चित्रपटातून गाळल्याने काय हशील होणार, हे समजण्यापलीकडचे आहे.
-शाहीद कपूर, अभिनेता

Web Title: Another big push for 'Flying Punjab'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.