बॉलिवूडला मिळणार आणखी एक सुंदर चेहरा! ‘या’ चित्रपटातून करणार डेब्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 11:16 IST2018-02-12T05:46:18+5:302018-02-12T11:16:18+5:30
दक्षिण भारतीय म्हणून ओळखल्या जाणाºया अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैजयंतीमालापासून श्रीदेवी, हेमा मालिनी ...
.jpg)
बॉलिवूडला मिळणार आणखी एक सुंदर चेहरा! ‘या’ चित्रपटातून करणार डेब्यू!
द ्षिण भारतीय म्हणून ओळखल्या जाणाºया अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैजयंतीमालापासून श्रीदेवी, हेमा मालिनी ते दीपिका पादुकोणपासून निधी अग्रवालपर्यंत अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये झेंडा रोवला होता. आता साऊथचा एक आणखी एक सुंदर चेहरा बॉलिवूडला मिळणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे श्रद्धा श्रीनाथ.
होय, ‘मिलन टॉकिज’ या चित्रपटातून श्रद्धा बॉलिवूड डेब्यू करणार, अशी खबर आहे. खरे तर ‘मिलन टॉकिज’ या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. पाच वर्षांपूर्वी शाहिद कपूरला घेऊन हा चित्रपट तयार होणार होता. पण त्यावेळी हा चित्रपट रखडला आणि पुढे रखडत गेला. पण आता या चित्रपटाची पुन्हा चर्चा आहे. दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया यांनी पुन्हा एकदा हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. अर्थात यावेळी शाहिद कपूर नाही तर अली फजलला घेऊन ते हा चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटासाठी अलीला साईन करण्यात आले आहे आणि आता अलीला त्याची हिरोईन मिळाल्याचीही खबर आहे. ही हिरोईन म्हणजेच श्रद्धा श्रीनाथ.
![]()
श्रद्धाने अनेक कन्नड व तामिळ चित्रपटांत काम केले आहे. साऊथ इंडस्ट्रीत श्रद्धा श्रीनाथ एक मोठे नाव आहे. बेंगळुरू फ्लायओवरवरील एका अपघाताच्या सत्यकथेवर बेतलेल्या ‘यु टर्न’ या कन्नड चित्रपटातील भूमिकेसाठी श्रद्धाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला होता. श्रद्धाचे वडिल लष्करात आहे. सोशल मीडियावर आपल्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत राहणारी हीच श्रद्धा ‘मिलन टॉकिज’मध्ये दिसणार आहे.
‘मिलन टॉकिज’ हा चित्रपट एका चित्रपटगृहाची कथा आहे. मल्टीप्लेक्सच्या काळात सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांना उतरती कळा लागली आहे. ‘मिलन टॉकिज’ याच संघर्षावर आधारित आहे. येत्या मार्चमध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ, मथुरा आणि वृंदावन येथे या चित्रपटाचे शूटींग होणार आहे.