प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:43 IST2024-10-22T17:41:35+5:302024-10-22T17:43:09+5:30

हिरोला किस करण्यात कोणत्याच हिरोईनला प्रॉब्लेम नसतो, अन्नू कपूरचं वक्तव्य चर्चेत

Annu Kapoor reveals Priyanka Chopra refused to kiss me because i dont have hero personality | प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."

प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."

अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांची एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांच्या अनेक वक्तव्यांची चर्चा होत आहे. त्यातलंच एक विधान म्हणजे अभिनेत्रींना हिरोंना किस करण्यात काही अडचण नसते असं ते म्हणाले. प्रियंका चोप्राचं उदाहरण देत त्यांनी ही गोष्ट सांगितली. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं जे आता व्हायरल होत आहे. ृ

अन्नू कपूर म्हणाले, "सात खून माफमध्ये काम करत असताना एक बातमी आली होती की प्रियंका चोप्राने अन्नू कपूरला किस करण्यास नकार दिला. जर कोणी हिरो असता तर प्रियंकाला किस करण्यात काहीच अडचण नसती. हिरोला किस करण्यात कोणत्याच हिरोईनला प्रॉब्लेम नसतो. माझ्याकडे ना चेहरा, ना पर्सनॅलिटी आहे म्हणून त्यांना अडचण आहे."

या मुलाखतीत ते देशप्रेमाबद्दलही बोलले. ते म्हणाले,"माझी पत्नी अमेरिकन आहे पण मी कधीच ग्रीन कार्ड किंवा युएसए नागरिकत्वासाठी अर्ज केला नाही. मी मरेन पण भारत सोडणार नाही."

अन्नू कपूर यांनी हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकतेच ते 'हमारे बारह' सिनेमात दिसले. गेल्या वर्षी त्यांनी 'ड्रीम गर्ल 2' मध्येही काम केलं. 

Web Title: Annu Kapoor reveals Priyanka Chopra refused to kiss me because i dont have hero personality