प्रेक्षकांच्या भेटीला ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ सज्ज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 17:11 IST2016-09-14T11:41:10+5:302016-09-14T17:11:10+5:30
ज्येष्ठ समाजसेवक व प्रसिध्द गांधीवादी नेते अण्णा हजारे यांच्या जीवनावर आधारित 'अण्णा : किसन बाबूराव हजारे' हा चित्रपट १४ ...

प्रेक्षकांच्या भेटीला ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ सज्ज !
या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक उदापूरकर यांनी केले असून अण्णा हजारेंची भूमिकाही त्यांनीच साकारली आहे. अभिनेत्री तनिषा मुखर्जी यात महिला पत्रकाराची भूमिका केलीय.
चित्रपटाची कथा अण्णांच्या लहानपणापासून सुरुवात होते. त्यानंतर त्यांचे सैन्यात भरती होणे, आत्महत्येचा प्रयत्न, त्यानंतरचा जीवनसंघर्ष, राणेगळसिध्दीत केलेला सामाजिक बदल, भ्रष्टाचार विरुध्दचा लढा अशा अनेक गोष्टींचा समावेश चित्रपटात असल्याचे निर्माता जैन यांनी सांगितले.