​अंकिताने केले ब्रेकअपवर शिक्कामोर्तब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 21:14 IST2016-04-27T15:41:07+5:302016-04-27T21:14:58+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये नाते तुटण्याची लाटच आली आहे. हृतिक-सुझैन, फरहान अख्तर-अधुना, विराट-अनुष्का असे एका मागून एक सेलिब्रेटी कपल वेगळे झाले. त्यातच ...

Ankita sealed the ban break? | ​अंकिताने केले ब्रेकअपवर शिक्कामोर्तब?

​अंकिताने केले ब्रेकअपवर शिक्कामोर्तब?

्या बॉलिवूडमध्ये नाते तुटण्याची लाटच आली आहे. हृतिक-सुझैन, फरहान अख्तर-अधुना, विराट-अनुष्का असे एका मागून एक सेलिब्रेटी कपल वेगळे झाले. त्यातच आणखी एक भर म्हणजे सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचेदेखील ब्रेक अप झाल्याची चर्चा सुरू झाली.

मीडियापासून दोघांनी कधीही रिलेशनशिप लपवून ठेवली नाही. सुशांतने तर अंकिताला एका टीव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रोपोज केले होते. ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेत दोघांचे प्रेम जुळले होते. नंतर सुशांतचे मोठ्या पडद्यावर आगमन झाले आणि दोघांच्या दुराव्याची अफवा उठू लागल्या.

परंतु एवढी वर्षे दोघांमध्ये प्रेम बहरतच जात होते. मात्र, अलिकडच्या काळात दोघांचे खटके उडत असल्याची जोरदार चर्चा होऊ लागली. एवढेच नाही तर त्यांचा ब्रेक अपदेखील झाला, अशी माहिती मिळत होती. सुशांत यावर प्रतिक्रिया देण्याचे कटाक्षाने टाळतो तर अंकितानेदेखील अशा वृत्ताचे खंडन केले होते.

मात्र अंकिता ज्यापद्धतीने ट्विटस करत आहे. त्यावरून तरी असे वाटत आहे की, दोघांचे ब्रेक अप झाले आहे. एका ट्विटमध्ये ती म्हणते, एवढ्या वर्षांमध्ये मला कोणी स्वत:वर प्रेम करण्याचे महत्त्व नाही शिकवले.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये अंकिता लिहिते, माझ्या बेरंग झालेल्या जीवनात रंग भरणारे मित्र किती महत्त्वाचे आहेत हे मला कधी कळालेच नाही. या सर्व ट्विट्सबरोबर तिने एकदम सॅड फोटोज् शेअर केले आहेत. आता याचा काय अर्थ काढायचा, तुम्हीच सांगा.

Web Title: Ankita sealed the ban break?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.