पुन्हा का चर्चेत आली अंकिता लोखंडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 06:30 IST2018-08-18T16:10:06+5:302018-08-20T06:30:00+5:30
एका मुलाखतीत तिने आपले मन मोकळे करत नव्या नात्याचा शोध घेत असल्याचे सांगितले होते.

पुन्हा का चर्चेत आली अंकिता लोखंडे?
बॉलिवूड सेलिब्रेटींचे रसिकांचं प्रेम इतकं आहे की त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे याबाबत जाणून घेण्यास ते उत्सुक असतात. मग ते त्याचं अफेअर असो, लग्नाच्या चर्चा किंवा मग त्याच्यावर सुरु असलेली कोर्ट केस असो, प्रत्येक विषयात सेलिब्रेटींच्या फॅन्सना रस असतो. सध्या बॉलिवूडमध्ये बँड बाजा बारातचे सुर घुमु लागलेत. प्रियांका चोप्राचे, दीपिका आणि रणवीर सिंह हे दोघंही लग्नामुळे चर्चेत आहेत. तर दुसरी कडे इंडस्ट्रीत वयाची 40 आणि 45 वर्ष ओलांडुनही अविवाहीत असलेल्या अभिनेत्रीही चर्चेत आले आहेत.अविवाहीत असलेल्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीं इंडस्ट्रीत आहेत.त्यांच्या नावाची यादी तशी खुप मोठी.मात्र आता अंकिता लोखंडे सिंगल असल्यामुळे चर्चेत आली आहे.बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. अगदी त्याचप्रकारे अंकिता लोखंडेचे सुशांत सिंह राजपुतसह असलेले नाते संपुष्टा आले. अनेकदा दोघांच्या पॅचअपच्याही बातम्या खुमासदारपणे रंगवल्या गेल्या.
आता अंकिता आणि सुशांत सिंग राजपूत यांचे ब्रेकअप होऊन आता बराच काळ लोटला आहे. या मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पण सुशांत वा अंकिता दोघांनीही या ब्रेकअपबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. खरे तर या ब्रेकअपमुळे अंकिता तुटून पडली. काही काळ नैराश्यानेही तिला ग्रासले. पण तरिही तिने आपले मौन तोडले नाही़. एका मुलाखतीत तिने आपले मन मोकळे करत नव्या नात्याचा शोध घेत असल्याचे सांगितले होते. मी माझ्या जुन्या नात्यातून बाहेर पडले आहे आणि निश्चितपणे माझ्या प्रिन्स चार्मिंगच्या प्रतीक्षेत आहे,असे ती म्हणाली होती.अर्थात ताज्या बातम्या मानाल तर अंकिताच्या आयुष्यात तिचा प्रिन्स चार्मिंग आला आहे. होय, अंकिता बिझनेसमॅन विकी जैनला डेट करत असल्याचे कळतेय. विकी हा बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहभागीदार आहे.त्यामुळे आता अंकिताही विवाहबंधनात कधी अडकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.