'किती निर्लज्ज आहेस...'; सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल बोलून ट्रोल झाली अंकिता लोखंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:01 IST2023-11-01T13:00:33+5:302023-11-01T13:01:09+5:30

दिवंगत अभिनेता सुशांत सिंगचे चाहते अंकितावर चांगलेच संतापले असून तिला ट्रोल करत आहेत.

Ankita Lokhande got trolled for talking about her breakup with Sushant | 'किती निर्लज्ज आहेस...'; सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल बोलून ट्रोल झाली अंकिता लोखंडे

'किती निर्लज्ज आहेस...'; सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल बोलून ट्रोल झाली अंकिता लोखंडे

 बिग बॉस सीझन 17 हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय झाला आहे. बिग बॉस - 17  शोमध्ये टीव्ही सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया स्टार्सपर्यंत अनेक स्पर्धक सहभागी झाले आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि पती विकी जैनसोबत सहभागी झाली आहे.  'बिग बॉस 17' च्या घरात पहिल्या दिवसापासून अंकिता लोखंडे चर्चेत आहे. नुकतेच अंकिता लोखंडे बिग बॉसमध्ये तिचा प्रियकर आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण काढताना दिसली. यावरुन सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताला ट्रोल केलं आहे. 

बिग बॉसच्या घरात अंकिता आणि मुनव्वर फारुकी गार्डन परिसरात फिरत होते. यावेळी अंकिता तिच्या आणि सुशांतच्या ब्रेकअपबद्दल बोलली. यावेळी अंकिताने सांगितले की, कोणतेही कारण नसताना दोघांचे ब्रेकअप झाले. एका रात्रीत तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. पुढे अंकिता म्हणाली की, ' सुशांतच्या आयुष्यात जर अंकिता असती तर त्याने कदाचित आत्महत्या केली नसती असं लोकांना वाटत होत. मात्र जेव्हा दोघांचे नाते तुटलं तेव्हा ती लोकं कुठे होती. त्यावेळेस तो प्रसिद्धीच्या झोतात होता त्यावेळी त्याची कान भरणारी लोकही होती. तो निर्णय त्याचा होता मी त्याला कोणत्याच गोष्टीसाठी रोखलं नाही'.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी अंकिताची बाजू घेत आहे तर काही तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहलं, 'किती निर्लज्ज आहे, अटेंशन मिळावं म्हणून काय करत आहे'. तर दुसऱ्याने लिहिले, 'ही सुशांतचे नाव घेऊन व्हिक्टिम कार्ड खेळत आहे, जेणेकरून तिला सहानुभूती मिळावी'. सुशांतचे चाहते अंकितावर चांगलेच संतापले असून तिला ट्रोल करत आहेत. 

अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत या दोघांनी पवित्र रिश्ता मालिकेत एकत्र काम केलं होतं. दोघांचीही ही पहिलीच मालिका होती. दोघं सात वर्ष एकत्र होते. पण 2016 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. आता अंकिताने विक्की जैनसोबत लग्न केले आहेत. हे दोघेही बिग बॉसच्या घरात एकत्र गेम खेळत आहे. 
 

Web Title: Ankita Lokhande got trolled for talking about her breakup with Sushant