अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या नात्यात आला दुरावा?, अभिनेत्री म्हणाली - 'हा गुडबाय...!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:09 IST2021-06-03T16:08:56+5:302021-06-03T16:09:20+5:30

अंकिता लोखंडे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

Ankita Lokhande and Vicky Jain's relationship came to an end ?, the actress said - 'This is goodbye ...!' | अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या नात्यात आला दुरावा?, अभिनेत्री म्हणाली - 'हा गुडबाय...!'

अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या नात्यात आला दुरावा?, अभिनेत्री म्हणाली - 'हा गुडबाय...!'

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने एक दिवस आधीच पवित्र रिश्ता मालिकेला १२ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन केले होते. यादरम्यान अंकिता लोखंडेने एका व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना एक स्पेशल मेसेज दिला होता. अंकिता लोखंडे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अंकिताची नवीन पोस्ट पाहून चाहते हैराण झाले आहेत. इंस्टाग्रामवर अंकिता लोखंडे हिने एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, हा गुडबॉय नाही..नंतर भेटूयात. आता अंकिताने काय विचार करून ही पोस्ट शेअर केली, हे तिलाच माहित आहे.


तिची ही पोस्ट पाहून कोणालाही हेच वाटेल की, तिच्यात आणि विकी जैनमध्ये काहीच ठीक नाही. सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे बिझनेसमन विकी जैनसोबत रिलेशनशीपमध्ये आली. मागील ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे आणि ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.


काही लोकांचे हेदेखील म्हणणे आहे की सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला एक वर्षे होण्याआधीच अंकिता लोखंडेने सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. खरेतर सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेला सर्वात जास्त ट्रोल केले गेले होते. कदाचित तिने अंकिताने ट्रोलिंगपासून बचाव करण्यासाठी हा निर्णय घेतला असेल.


सुशांत सिंग राजपूतच्या निधनाचे वृत्त समोर येताच त्याचे चाहते सोशल मीडियावरील अकाउंट पाहू लागले होते. सुशांतने मागील वर्षी ३ जूनला शेवटची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर ८ जूनला त्याने दिशा सालियानच्या निधनाच्या वृत्तासोबत आपल्या स्टोरीवर श्रद्धांजली वाहिली होती.

Web Title: Ankita Lokhande and Vicky Jain's relationship came to an end ?, the actress said - 'This is goodbye ...!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.