अंकिता लोखंडेनं घरी आणली इतक्या कोटींची लक्झरी कार, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 12:33 IST2022-03-02T12:30:55+5:302022-03-02T12:33:03+5:30
अर्चना नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लग्नानंतर सतत चर्चेत आहे. तूर्तास चर्चा आहे ती अंकिताच्या नव्या कोऱ्या कारची.

अंकिता लोखंडेनं घरी आणली इतक्या कोटींची लक्झरी कार, पाहा व्हिडीओ
अर्चना नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लग्नानंतर सतत चर्चेत आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तिने विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नगाठ बांधली. या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तूर्तास चर्चा आहे ती अंकिताच्या नव्या कोऱ्या कारची. होय, अंकिता व विकी यांनी नुकतीच सुपर लक्झरी मर्सिडीज V220D (Super luxury Mercedes v220D car) खरेदी केली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने अंकिताचा कारची डिलिव्हरी घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नवी कोरी कार घरी आल्याचा आनंद अंकिताच्या चेहऱ्यावर दिसतोय. दोघांनीही केक कापून, कारची पूजा करून आनंद साजरा केला. अंकिताने खरेदी केलेल्या या कारची किंमत 1.10 कोटी आहे. बिल गेट्सच्या कार कलेक्शनमध्येही याचा समावेश आहे.
सध्या अंकिता व विकी दोघंही ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहेत. अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं. विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे.