अंकिताला भन्साळींची लॉटरी?? ‘पद्मावती’तून बॉलिवूड डेब्यू??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 20:53 IST2016-06-29T15:23:11+5:302016-06-29T20:53:11+5:30
सुशांत सिंह राजपूत याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर सैरभर झालेली अंकिता लोखंडे चांगलीच सावरलीय..अंकिता गुणी अभिनेत्री आहे. नृत्यात निपुण आहे, हे आपण ...
.jpg)
अंकिताला भन्साळींची लॉटरी?? ‘पद्मावती’तून बॉलिवूड डेब्यू??
स शांत सिंह राजपूत याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर सैरभर झालेली अंकिता लोखंडे चांगलीच सावरलीय..अंकिता गुणी अभिनेत्री आहे. नृत्यात निपुण आहे, हे आपण जाणतोय. २०१४ मध्ये आलेल्या ‘पवित्र रिश्ता’मधून घरात घरात पोहोचलेल्या अंकिताच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. ‘पवित्र रिश्ता’नंतर अंकिता ‘कुछ तो है तेरे मेरे दरमियांन’मध्ये एका कॅमिओ रोलमध्ये दिसली. पण त्यानंतर अॅक्टिंगपेक्षा अंकिता अधिक चर्चेत राहिली ती सुशांतसोबतच्या रिलेशनशिपमुळेच..पण आता अंकिताकडेही मोठ्ठी बातमी आहे म्हणे..एका बातमीनुसार, अंकिता संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’मध्ये भूमिका मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतेय. अलीकडे ‘पद्मावती’च्या मेकर्सच्या आॅफिसमध्ये अंकिता दिसून आली. शिवाय याठिकाणी मेकर्ससोबत तिची दीर्घ चर्चा झाल्याचेही कळते. चित्तोरची राणी पद्मावती हिच्या भूमिकेसाठी आधीच दीपिका पदुकोणचे नाव चर्चेत आहे. अशास्थितीत अंकिताची या चित्रपटात काय भूमिका राहिल, हे ठाऊक नाही. पण या चित्रपटात अंकिताला ब्रेक मिळालाच तर अंकितासाठीच नाही तर तिच्या चाहत्यांसाठीही ही मोठ्ठी खूशखबर असेल..