​अंकित तिवारीला कोर्टाचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 22:26 IST2016-04-29T16:56:25+5:302016-04-29T22:26:25+5:30

‘आशिकी २’सिंगर  अंकित तिवारी याला  मुंबईच्या एका विशेष महिला न्यायालयाने गर्लफे्रन्डवरील कथित बलात्कार प्रकरणी काहीसा दिलासा दिला. गुरुवारी विशेष ...

Ankit Tiwari's court relief | ​अंकित तिवारीला कोर्टाचा दिलासा

​अंकित तिवारीला कोर्टाचा दिलासा

शिकी २’सिंगर  अंकित तिवारी याला  मुंबईच्या एका विशेष महिला न्यायालयाने गर्लफे्रन्डवरील कथित बलात्कार प्रकरणी काहीसा दिलासा दिला. गुरुवारी विशेष न्यायालयाने अंकितविरूद्धच्या अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ४ मे रोजी होणार आहे. हे प्रकरण सन २०१४चे आहे. २०१२ ते २०१३ या काळात लग्नाचे आमीष दाखवून अंकितने आपल्यावर अनेकदा बलात्कार केला, असा अंकितच्या एक्स गर्लफ्रेन्डचा आरोप आहे. अंकितने बर्थ पार्टीत बळजबरीने मद्य पाजून आपल्यावर बलात्कार केल्याचा दावाही तिने केला आहे. अर्थात अंकितने स्वत:वरील सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर ८ मे २०१४ रोजी पोलिसांनी अंकितला अटक केली होती.  

Web Title: Ankit Tiwari's court relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.