​अंजली पाटील सांगतेय, रजनिकांत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 12:57 IST2017-09-09T07:27:30+5:302017-09-09T12:57:30+5:30

राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा मिर्झिया हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाद्वारे अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन ...

Anjali Patil says, the experience of working with Rajnikanth is very good | ​अंजली पाटील सांगतेय, रजनिकांत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला

​अंजली पाटील सांगतेय, रजनिकांत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला

केश ओमप्रकाश मेहरा यांचा मिर्झिया हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाद्वारे अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटाला प्रेक्षकांची तितकीशी पंसती मिळाली नसली तरी या चित्रपटाच्या कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. या चित्रपटात अंजली पाटील नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. 
अंजली पाटील दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांच्यासोबत काला या चित्रपटात झळकणार आहे. रजनिकांत यांच्यासोबत काम करायला मिळत असल्याने अंजली चांगलीच खूश आहे. तिच्या करियरमधील हा सगळ्यात मोठा चित्रपट असल्याने ती या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. रजनिकांत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असल्याचे ती सांगते. अंजली तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी सांगते, गेल्या ४० वर्षांपासून रजनिकांत यांनी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ते सुपरस्टार असले तरी ते खूपच नम्र आहेत. लोकांशी नम्रतेने कसे वागायचे ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आजवर त्यांच्याइतका नम्र कलाकार मी पाहिलेला नाही. आजवर अनेक चित्रपटात काम करूनही प्रत्येक चित्रपट हा त्यांचा पहिला चित्रपट असल्यासारखेच ते वागतात. ते सेटवर खूपच उत्साहित असतात. तसेच नवनव्या गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल असतो. प्रत्येक कलाकाराने त्यांच्याकडून शिकले पाहिले. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.
अंजलीने याआधीदेखील अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक चित्रपट गाजले देखील आहेत. तसेच तिला तिच्या एका तेलगू चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. काला या चित्रपटासोबतच अंजली माय क्लाईंटस वाइफ या हिंदी चित्रपटात आणि नागराज मंजुळे यांच्या द सायलन्स या मराठी चित्रपटात झळकणार आहे. तसेच लवकरच प्रदर्शित होणाऱ्या न्यूटन या राजकुमार रावच्या चित्रपटात देखील ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

Also Read : 'थलायवा'सह या अंजली पाटीलचा सेल्फी ठरतोय सुपरहिट

Web Title: Anjali Patil says, the experience of working with Rajnikanth is very good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.