Animalच्या यशानंतर इतकं बदललं तृप्ती डिमरीचं आयुष्य, म्हणाली.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:47 IST2023-12-11T13:45:45+5:302023-12-11T13:47:32+5:30
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal सिनेमातून अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) रातोरात नॅशनल क्रश बनली आहे.

Animalच्या यशानंतर इतकं बदललं तृप्ती डिमरीचं आयुष्य, म्हणाली.....
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal सिनेमातून अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) रातोरात नॅशनल क्रश बनली आहे. सिनेमातील मुख्य अभिनेत्री रश्मिकालाही तिने साईडलाईन केले आहे. तृप्ती आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री, त्यांचे इंटिमेट सीन्स चर्चेचा विषय ठरले आहेत. या सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल मुख्य कलाकार असले तरी एका सहअभिनेत्रीने सिनेमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. ती म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri).
अभिनेत्री तृप्ती डिमरीने Animal मध्ये इंटिमेट सीन्स दिले आहेत. सिनेमातील तिची भूमिका खूपच छोटी आहे मात्र तिची रणबीर कपूरसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्रीच्या फॉलोअर्सच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतेच तृप्ती डिमरीने सांगितले की, Animalच्या यशामुळे तिचे आयुष्य किती बदलले आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तृप्ती डिमरी म्हणाली, "मला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे, जी नेहमीच एक अतिशय सुंदर भावना असते." तृप्तीने सांगितलं की तिचा फोन सतत वाजत आहे आणि सर्वांना तिला भेटायचं आहे. सगळ्यांनाकडून मिळणार प्रेम पाहून तिची रात्रीची झोप उडाली गेली.''
तृप्ती डिमरीचा Animal हा पहिला सिनेमा नाही. तिने लैला मजनू चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय 'बुलबुल','कला' या सिनेमांनी तिला लोकप्रियता दिली होती. पण Animal सिनेमामुळे ती जास्त प्रसिद्धीझोतात आली. यानंतर तृप्ती 'मास महाराजा' मधून साऊथमध्ये डेब्यू करणार आहे.