Animal : "मी गीतांजलीबाबत काही प्रश्न विचारले होते, पण...", रश्मिकाची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:09 IST2023-12-09T11:05:53+5:302023-12-09T11:09:36+5:30

'ॲनिमल' मधील गीतांजलीसाठी रश्मिकाची खास पोस्ट, म्हणाली, "माझ्या नजरेत ती..."

animal ranbir kapoor movie rashmika mandanna shared post for geetanjai reply to trollers | Animal : "मी गीतांजलीबाबत काही प्रश्न विचारले होते, पण...", रश्मिकाची पोस्ट चर्चेत

Animal : "मी गीतांजलीबाबत काही प्रश्न विचारले होते, पण...", रश्मिकाची पोस्ट चर्चेत

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाच्या 'ॲनिमल' सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ठिकठिकाणी 'ॲनिमल'चे शो हाऊसफूल होताना दिसत आहेत. या सिनेमात रश्मिकाने रणबीरच्या पत्नीची गीतांजलीची भूमिका साकारली आहे.  पण, 'ॲनिमल' मधील रश्मिकाच्या भूमिकेला ट्रोल केलं जात आहे. 'ॲनिमल'ला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम आणि गीतांजलीसाठी रश्मिकाने खास पोस्ट शेअर केली आहे. 

रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'ॲनिमल'च्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने गीतांजलीबद्दल भाष्य केलं आहे. "कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्यासाठी एकमेव शक्ती...असं मी गितांजलीचं एका वाक्यात वर्णन करेन. ती निर्मळ, खरी आणि सामर्थ्यवान आहे. ही भूमिका साकारताना गीतांजलीबाबत मी काही प्रश्न  उपस्थित केले होते. तेव्हा माझे दिग्दर्शक मला म्हणाले होते की ही रणविजय आणि गीतांजलीची गोष्ट आहे. हे त्यांचं प्रेम आहे. त्यांचं कुटुंब आणि त्यांचं आयुष्य आहे," असं   रश्मिकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे तिने, "हिंसा, दु:ख आणि असह्य वेदना देणाऱ्या या जगात गीतांजली शांतता आणि विश्वास आणते. पती आणि मुलांचं रक्षण करण्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते. वादळाचा परिणाम न होणाऱ्या दगडासारखी ती आहे. तिच्या कुटुंबासाठी ती काहीही करू शकते. माझ्या नजरेत गीतांजली हे एक सुंदर व्यक्तिमत्त्व आहे. कुटुंबांच रक्षण करणाऱ्या अनेक स्त्रियांसारखीच तीदेखील आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार..." असंही म्हटलं आहे.  

रणबीर आणि रश्मिका मुख्य भूमिकेत असलेल्या 'ॲनिमल'मध्ये बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप वांगा रेड्डी यांनी केलं आहे. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 
 

Web Title: animal ranbir kapoor movie rashmika mandanna shared post for geetanjai reply to trollers