Animal फेम 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरी दिसली 'मिस्ट्री मॅन'सोबत, Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 11:58 AM2023-12-17T11:58:16+5:302023-12-17T11:58:55+5:30

तृप्ती डिमरीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा एका हँडसम मुलाबरोबर सेल्फी आहे.

Animal fame National Crush Tripti Dimri seen with Mystery Man Photos viral | Animal फेम 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरी दिसली 'मिस्ट्री मॅन'सोबत, Photos व्हायरल

Animal फेम 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरी दिसली 'मिस्ट्री मॅन'सोबत, Photos व्हायरल

Animal सिनेमातून नॅशनल क्रश म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरीची (Tripti Dimri) क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. काही हजारात असलेले तिचे फॉलोअर्स बघता बघता 30 लाखांवर पोहोचले आहेत. तृप्ती नुकतीच तिच्या ओळखीतील एका लग्नसोहळ्यात दिसली. या लग्नातील फोटो तृप्तीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. दरम्यान एका फोटोत तृप्तीसोबतच्या मिस्ट्री मॅनला पाहून नेटकऱ्यांना भलतेच प्रश्न पडले आहेत.

तृप्ती डिमरीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा एका हँडसम मुलाबरोबर सेल्फी आहे. इतर मित्रपरिवारासोबत तृप्तीने अनेक फोटो शेअर केले असले तरी तिचा हा फोटो खूपच व्हायरल होतोय. तिच्यासोबत असलेल्या या हँडसम मुलाचं नाव सॅम मर्चंट आहे. दोघांनी व्हाईट रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांचा सेल्फी सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. नॅशनल क्रशचा हा बॉयफ्रेंड आहे का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय.

तृप्ती आणि सॅम लव्हबर्ड्स असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय. चाहत्यांनी तर सॅमबद्दल माहितीही काढली आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांनी अंदाज लावला की त्याचं गोव्यात एक रेस्टॉरंट आहे. 'वॉटर्स बीच लाऊंज अँड ग्रिल' असं रेस्टॉरंटचं नाव आहे. त्याची लाईफस्टाईल बघून तो खूपच श्रीमंत असल्याचं दिसून येतंय.

तृप्ती डिमरीचं नाव यापूर्वी अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मासोबत जोडलं गेलं होतं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. कर्णेशच्याच 'बुलबुल','कला' सिनेमात तृप्तीला संधी मिळाली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांचं नातं तुटलं. 

Web Title: Animal fame National Crush Tripti Dimri seen with Mystery Man Photos viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.