सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:27 AM2023-12-06T09:27:20+5:302023-12-06T09:27:42+5:30

'या' आघाडीच्या अभिनेत्याने नाकारले दोन मोठे चित्रपट

Animal and Sam Bahadur movie was first offered to Ranveer Singh now he is regretting | सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप

सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप

सध्या गाजत असलेले दोन चित्रपट 'Animal' आणि 'सॅम बहादुर' तुफान कमाई करत आहेत. रणबीरच्या (Ranbir Kapoor) Animal चे तर मध्यरात्रीही शो सुरु आहेत. विकी कौशलने (Vicky Kaushal) साकारलेल्या सॅम मानेकशॉच्या भूमिकेचंही कौतुक होतंय. पण तुम्हाला माहितीये का हे दोन्ही चित्रपट एकाच अभिनेत्याला ऑफर झाले होते. त्या अभिनेत्याने दोन्ही सिनेमांना नकार दिला आणि आता त्याला या निर्णयाचा पश्चात्ताप होतोय.

मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादुर सिनेमाचं सगळेच कौतुक करत आहेत. विकीने सॅम मानेकशॉ यांची भूमिका चोख साकारली आहे. मेघना गुलजारने मात्र या सिनेमासाठी आधी रणवीर सिंहचा (Ranveer Singh) विचार केला होता. मेघनाने रणवीरला ऑफर दिली असता तेव्हा तो कपिल देव यांच्यावर आधारित 83 सिनेमात व्यस्त होता. त्याला लगेच दुसऱ्या बायोपिकमध्ये काम करायची इच्छा नव्हती. म्हणूनच त्याने सॅम बहादुरला नकार दिला. तसंच सॅम मानेकशॉच्या पत्नीच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला विचारण्यात आलं होतं. मात्र तिनेही या मेघना गुलजारला नकार कळवला. 

इतकंच नाही तर संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal सिनेमाही आधी रणवीर सिंहला ऑफर करण्यात आला होता. दिग्दर्शकाने या सिनेमाबद्दल रणवीरला विचारलं असता त्याला सिनेमा फारच हिंसक वाटला. या कारणाने रणवीरने ऑफर रिजेक्ट केली. 

रणवीर सिंहचे गेले काही चित्रपट फ्लॉप झालेत. 83 सिनेमा बॉक्सऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. जयेशभाई जोरदार या वेगळ्या विषयावर आधारित सिनेमाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. शिवाय रोहित शेट्टीचा सर्कसही दणकून आपटला. मात्र काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाने चांगलं यश मिळवलं. तरी रणवीर दोन मोठ्या सिनेमांना मुकला. 

Web Title: Animal and Sam Bahadur movie was first offered to Ranveer Singh now he is regretting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.