अनिलमधला प्रेमळ ‘बाप’माणूस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 17:11 IST2016-07-14T11:17:14+5:302016-07-14T17:11:32+5:30
बॉलीवुडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर सध्या '24 सीझन-2' मध्ये बिझी आहे. याशिवाय विविध सिनेमांची भली मोठी लिस्टही त्याच्या आगामी ...
.jpg)
अनिलमधला प्रेमळ ‘बाप’माणूस !
ब लीवुडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर सध्या '24 सीझन-2' मध्ये बिझी आहे. याशिवाय विविध सिनेमांची भली मोठी लिस्टही त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये आहे. असं असताना बॉलीवुडमध्ये काम करणा-या आपल्या मुलांना तो वेळ देतो का, त्यांची त्याला काळजी वाटते का असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. खुद्द अनिलनं मात्र आपण आपल्या मुलांची बिल्कुल चिंता करत नसल्याचं म्हटलंय. सोनम, रिया आणि हर्षवर्धन यांना अनिलनं त्यांच्या बालवयात प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. मात्र आता सोनम तिच्या अभिनयात नाव कमावतेय.लवकरच हर्षवर्धनही बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवतोय आणि रिया निर्माती म्हणून स्वतःची जागा बनवू पाहतेय. मुलं लहान असताना पालकांनी त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं असं अनिलला वाटतं. मात्र आता त्याची तिन्ही मुलं मोठी झाली असून आपापल्या परीनं ते स्वतःची काळजी घेऊ शकतात असं त्याला वाटतं. अभिनयात नाव कमावणा-या सोनम ज्यारितीनं या सृष्टीत वावरते, माध्यमांना सामोरं जाते याचाही या पित्याला सार्थ अभिमान आहे. तेच त्याला हर्षवर्धन आणि सोनमकडून अपेक्षित आहे..