​अनिल कपूरला लोकलमधील स्टंटबाजी पडली महागात, रेल्वेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 16:26 IST2016-07-15T09:56:02+5:302016-07-15T16:26:56+5:30

एका मालिकेसाठी लोकल रेल्वेवर चढून कराव्या लागलेल्या स्टंटबाजीमुळे अनिल कपूरला पश्चिम रेल्वेने नोटीस पाठविली आहे. ही स्टंटबाजी त्याला चांगलीच ...

Anil Kapoor's stunts in the locality, Railway notice | ​अनिल कपूरला लोकलमधील स्टंटबाजी पडली महागात, रेल्वेची नोटीस

​अनिल कपूरला लोकलमधील स्टंटबाजी पडली महागात, रेल्वेची नोटीस

ा मालिकेसाठी लोकल रेल्वेवर चढून कराव्या लागलेल्या स्टंटबाजीमुळे अनिल कपूरला पश्चिम रेल्वेने नोटीस पाठविली आहे. ही स्टंटबाजी त्याला चांगलीच महागात पडली आहे. 
एका वाहिनीवर सुरू होत असलेल्या मालिकासाठी अनिल कपूरने चर्चगेट स्टेशनवर शूटिंगसाठी परवानगी मागितली होती. आणि यासाठी रेल्वेने परवानगीही दिली होती. मात्र परवानगी देताना रेल्वेने प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये शुटिंग करण्यास मान्यता दिली होती. पण अनिल कपूरने फुटबोर्डवर चढून, लटकत स्टंटबाजी केली. इतकंच नाही तर चालत्या ट्रेनमधून लटकताना दिसला. त्यामुळे रेल्वेने यावर आक्षेप घेत, त्याला नोटीस पाठवली आहे.
रेल्वेच्या छतावरुन, फुटबोर्डला लटकत प्रवास करणाºयांवर रेल्वे कारवाई करते.  त्यामुळे अनिल कपूरच्या या स्टंटबाजीमुळे तरुणांना प्रोत्साहन मिळू शकतं. म्हणून रेल्वेने अनिल कपूरला नोटीस पाठविली आहे.

Web Title: Anil Kapoor's stunts in the locality, Railway notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.