अनिल कपूरचा ‘हा’ झक्कास फोटो बघून पत्नी आणि मुलींचा झाला होता भयंकर संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 15:46 IST2017-09-22T10:13:48+5:302017-09-22T15:46:08+5:30

झक्कास अभिनेता अनिल कपूर बॉलिवूडमधील असा कलाकार आहे, ज्याच्या वाढत्या वयाच्या त्याच्या दिसण्यावर कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. वयाच्या ...

Anil Kapoor's 'Ha' picture was a wife and a wife after seeing a fierce rage! | अनिल कपूरचा ‘हा’ झक्कास फोटो बघून पत्नी आणि मुलींचा झाला होता भयंकर संताप!

अनिल कपूरचा ‘हा’ झक्कास फोटो बघून पत्नी आणि मुलींचा झाला होता भयंकर संताप!

्कास अभिनेता अनिल कपूर बॉलिवूडमधील असा कलाकार आहे, ज्याच्या वाढत्या वयाच्या त्याच्या दिसण्यावर कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. वयाच्या साठीतही त्याच्यात एखाद्या यंगस्टर्सप्रमाणे एनर्जी आणि जोश आहे. अनिल कपूरच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातून एका छोट्याशा भूमिकेने झाली. हार्डवर्क आणि सर्वोत्कृष्ट अभिनयामुळे आज बी-टाउनमध्ये त्याचे नाव सन्मानाने घेतले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की, त्याच्या एका फोटोमुळे त्याच्या पत्नी आणि मुलींना अपमानास्पदाची भावना निर्माण झाली होती?

वास्तविक हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा अनिल कपूरने अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि वरुण धवनला आव्हान देण्यासाठी त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटोमध्ये अनिलने आॅरेंज स्लीवलेस ड्रेस आणि बूट घातलेला दिसत होता. त्याने कॅप्शनमध्ये सध्याचे यंगस्टर्स वरुण, रणवीर आणि अर्जुनला चॅलेंज देताना लिहिले होते की, ‘मी तुम्हा लोकांच्या तुलनेत अगोदरपासूनच फॅशन बाउंड्रीज पार करीत आहे. मी या फॅशन सेंसला पराभूत करण्याचे ओपन चॅलेंज देत आहे.’ मात्र अनिलचा हा फासा नेमका उलटा पडला. त्याला या फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. विशेष यामध्ये सोनम कपूर आणि रिया कपूर यांचाही हात होता. 



एका मुलाखतीत या फोटोविषयी सांगताना अनिल कपूरने म्हटले होते की, ‘हा फोटो बघून माझ्या मुली आणि पत्नी माझ्या कानाखाली लगावतील असेच काहीसे चित्र निर्माण झाले होते. त्यांनी माझा हा फोटो बघून म्हटले होते की, तुम्ही अशाप्रकारचा ड्रेस कसं काय परिधान करू शकता? पुढे बोलताना अनिलने म्हटले की, ‘मला अजूनही ही बाब समजली नाही की, अशाप्रकारचा ड्रेस परिधान करण्याचा माझ्यात कुठून कॉन्फिडेंस आला होता. या ड्रेसमुळे माझ्या हातावरील सर्व केस दिसत होते. माझे शूज लाल, पॅण्ट लाल आणि डोक्यावरील हॅटही लाल होती. 



असो, अनिल कपूर खरोखरच बी-टाउनमधील झक्कास अभिनेता आहे. त्यामुळेच त्याचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना पसंत येतो. नुकताच अनिलचा ‘मुबारका’ रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. सध्या अनिल कपूर ‘फन्ने खां’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: Anil Kapoor's 'Ha' picture was a wife and a wife after seeing a fierce rage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.