​अनिल कपूरने सोनमला अशा दिल्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड’साठीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 20:13 IST2017-01-15T20:13:57+5:302017-01-15T20:13:57+5:30

हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वांत मोठा मानला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा शनिवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात ...

Anil Kapoor wishes for the 'Filmfare Award' given by Sonamala | ​अनिल कपूरने सोनमला अशा दिल्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड’साठीच्या शुभेच्छा

​अनिल कपूरने सोनमला अशा दिल्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड’साठीच्या शुभेच्छा

ंदी चित्रपट सृष्टीतील सर्वांत मोठा मानला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा शनिवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री सोनम कपूरला ‘नीरजा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मॅफेअर क्रिटीक अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या सोबतच समीक्षकांच्या यादीतील तीनपैकी दोन पुरस्कार ‘नीरजा’ या चित्रपटाला मिळाले आहेत. आपल्या लेकीच्या  यशाचे सेलिब्रेशन करताना अभिनेते व वडील अनिल कपूरने फेसबुकवरून सोनमच्या लहानपणाचा फोटो शेअर केला आहे. 

फेसबुकवरून शुभेच्छा देताना अनिल कपूरने मुलगी सोनम कपूरचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फ ोटोमध्ये लहानशी सोनम आपले हात हनुवटीवर ठेवून हास्य मुद्रेत बसलेली दिसते आहे. या सोबतच अनिल कपूरने शुभेच्छा संदेशात तिची पाठ थोपटली आहे. अनिल कपूर लिहतो, ‘‘@सोनम कपूर मला तुझा फार अभिमान वाटतो आहे, फक्त पुरस्कारासाठी नाही, तुझ्या निवडी व निर्णयांसाठी...तुला ठाऊक आहे तू कोण आहेस आणि तू कधीच आव्हानांना पाठ दाखविणार नाहीस आणि हे एक अभिनेता व वडील म्हणून पाहणे आश्चर्यकारक ठरणार आहे. अभिनंदन बेटा...’’



आपल्या वडिलांकडून मिळालेल्या या प्रशंसेचा व अभिनंदनाचे बोल कोणत्याही मुलीसाठी अमुल्य आहेत. सोनम कपूरसाठी या शुभेच्छा खासच म्हणाव्या लागतील कारण चित्रपट सृष्टीतील सन्मानाचा समजला जाणारा अभिनेत्यांना दिला जाणारा क्रिटीक अवॉर्ड सोनम कपूरला देण्यात आला आहे. समीक्षक  पुरस्कार हा वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटात सर्वोत्कृष्ठ अभिनयासाठी देण्यात येतो. सोनमला ‘नीरजा’मधील भूमिकेसाठी यापूर्वी अनेक पुरस्कार मिळविले आहेत. 

अभिनेत्री सोनम कपूर हिच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात उत्तम सिनेमा म्हणून ‘नीरजा’कडे बघितले जाते. राम माधवानी यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा नीरजा भनोट यांच्या जीवनावर आधारित आहे. हायजॅक करण्यात आलेल्या फ्लाइटमध्ये नीरजा भनोट यांनी स्वत:चे बलिदान देऊन ३०० प्रवाशांना कसे सुरक्षित बाहेर काढले याची वास्तव कथा या सिनेमात दाखविण्यात आली. प्रेक्षकांना ती चांगलीच भावली. 

">http://

Web Title: Anil Kapoor wishes for the 'Filmfare Award' given by Sonamala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.