अनिल कपूर करणार पुतण्या अर्जुन कपूरच्या लग्नासाठी प्रयत्न ! वाचा इंटरेस्टिंग डिटेल्स!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 15:01 IST2017-07-12T09:31:32+5:302017-07-12T15:01:32+5:30
‘मुबारकां’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत असलेल्या अनिल कपूरने पुतण्या अर्जुन कपूरबद्दल एक आश्चर्याचा सुखद धक्का देणारा ...

अनिल कपूर करणार पुतण्या अर्जुन कपूरच्या लग्नासाठी प्रयत्न ! वाचा इंटरेस्टिंग डिटेल्स!!
‘ ुबारकां’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत असलेल्या अनिल कपूरने पुतण्या अर्जुन कपूरबद्दल एक आश्चर्याचा सुखद धक्का देणारा खुलासा केला आहे. होय, अनिलने अर्जुनच्या लग्नाबद्दल सूतोवाच केले आहे.
‘मुबारकां’मध्ये प्रथमच अनिल कपूर आणि अर्जुन कपूर ही काका-पुतण्याची जोडी एकत्र काम करताना दिसणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनिल बोलला आणि बोलता बोलता अर्जुनच्या लग्नापर्यंत जावून पोहोचला. आम्ही मुद्दाम ‘मुबारकां’ या चित्रपटात लग्नाभोवती फिरणारी कथा दाखवली. कारण अर्जुनने लग्न करावे, अशी माझी इच्छा आहे. आमच्या कुटुंबात अर्जुनचे लग्न सर्वप्रथम व्हावे, असे मला वाटते. किमान मी स्वत: तरी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे अनिल म्हणाला. यावर अर्जुन काय म्हणाला माहितीयं, ‘हो, बिल्कुल. २८ जुलैला माझे लग्न आहे. माझ्या लग्नात सामील होण्यासाठी तुम्ही जवळच्या चित्रपटगृहांत जावू शकता. दोनदा दोन वेगवेगळ्या मुलींशी लग्न करताना तुम्ही मला याठिकाणी पाहू शकाल’, असे अर्जुन म्हणाला. अर्थात हा सगळा प्रमोशन फंडा. प्रत्यक्षात अर्जुन कधी बोहल्यावर चढणार, हे आत्ताच सांगता येणार नाही.
ALSO READ : ‘मुबारकां’च्या रिलीजपूर्वी दिसली अर्जुन कपूर व अथिया शेट्टीची ‘हॉट केमिस्ट्री’!!
‘मुबारकां’मध्ये अर्जुन व अनिलशिवाय इलियाना डिक्रूज आणि अथिया शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २८ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. काही दिवसांपूर्वी ‘मुबारकां’चा ट्रेलर लॉन्च झाला होता. ट्रेलरवरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती, ती म्हणजे यात खूप सारी कॉमेडी आणि तेवढेच कन्फ्युजन असणार आहे. यात अर्जुन कपूर डबररोलमध्ये आहे. एक ‘पगडी’ लूकमध्ये आणि एक ‘पगडी’शिवाय असे त्याचे दोन अवतार आपल्याला यात पाहायला मिळणार आहेत.