अनिल कपूरला केस विंचरण्यासाठी लागले चक्क ५० तास, मग समोर आला असा लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 16:36 IST2017-11-08T11:06:56+5:302017-11-08T16:36:56+5:30
अभिनेता अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय ही जोडी ‘फन्ने खां’ या चित्रपटातून परतत आहे. ६० वर्षीय अनिल कपूर म्युझिशियनची ...
.jpg)
अनिल कपूरला केस विंचरण्यासाठी लागले चक्क ५० तास, मग समोर आला असा लूक!
अ िनेता अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय ही जोडी ‘फन्ने खां’ या चित्रपटातून परतत आहे. ६० वर्षीय अनिल कपूर म्युझिशियनची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. त्यामध्ये अनिल कपूरचा लूक बघण्यासारखा आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे काय? हा लूक धारण करण्यासाठी त्याला तब्बल ५० तास केस विंचरावे लागले. होय, जेव्हा संपूर्ण टीम त्याच्या लूकबद्दल फारशी समाधानी वाटली नसल्याने तो एका सलूनमध्ये पोहोचला. त्याठिकाणी त्याने तब्बल पाच दिवस दररोज दहा तास आपल्या केसांवर प्रयोग केले. त्यानंतर एक परफेक्ट लूक समोर आला.
अनिल कपूर चित्रपटात एका सडपातळ व्यक्तीच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. त्यासाठीदेखील त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. वास्तविक अनिल कपूर कुठल्याही भूमिकेत परफेक्ट दिसावे यासाठी प्रचंड मेहनत घेत असतो. त्यामुळेच आजही बॉलिवूडमध्ये अनिलचा शिक्का चालत आहे. सध्याच्या दमदार अभिनेत्यांच्या रेसमध्ये आजही अनिल कपूरला प्रेक्षकांकडून पूर्वीसारखेच पसंत केले जाते. त्यामुळेच त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
![]()
दरम्यान ‘फन्ने खां’ चित्रपटाचे निर्माता भूषण कुमार यांनी अनिलचे कौतुक करताना म्हटले की, ‘अनिल कपूर खूपच दमदार कलाकार आहे. तो प्रत्येक भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडून दोनशे टक्के प्रयत्न करीत असतो. चित्रपटांबद्दल त्याच्यामध्ये असलेला उत्साह किती आहे, हे त्याने लूकवर घेतलेल्या मेहनतीवरून स्पष्टपणे दिसून येते. अतुल मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट २३ एप्रिल २०१८ रोजी रिलीज केला जाणार आहे. चित्रपटात राजकुमार राव व नसिरुद्दीन शाह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.