अभिनेता अनिल कपूरचा ऑनस्क्रीन मुलगा झालाय इतका मोठा, दिसतोय खूपच हँडसम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:33 PM2022-02-28T19:33:17+5:302022-02-28T19:48:09+5:30

'हीरो नंबर -1' मध्ये तो गोविंदासमवेत दिसला होता. त्यानंतर 'जुदाई' हा चित्रपट तो अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा मुलगा म्हणून दिसला. '

Anil kapoor sridevi on screen son judaai child artist omkar kapoor then and now look | अभिनेता अनिल कपूरचा ऑनस्क्रीन मुलगा झालाय इतका मोठा, दिसतोय खूपच हँडसम

अभिनेता अनिल कपूरचा ऑनस्क्रीन मुलगा झालाय इतका मोठा, दिसतोय खूपच हँडसम

googlenewsNext

फिल्मस्टार्सचे बालपणीचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. पण ज्यांना तुम्ही फक्त चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून पाहिले आहे, त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला ओळखता येईल का? आता जुदाई या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत दिसलेला चिमुकला आता मोठा झालाय. 


या बालकाराचे नाव ओमकार कपूर आहे. ओमकार आता मोठा झाला आहे आणि आता तो क्युट नाहीतर हँडसम दिसतो. ओमकार कपूरने लहानपणी बऱ्याच चित्रपटांत आपले अभिनय कौशल्य दाखवलेले होते.  'हीरो नंबर -1' मध्ये तो गोविंदासमवेत दिसला होता. त्यानंतर 'जुदाई' हा चित्रपट आला ज्यामध्ये ओमकार अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा मुलगा म्हणून दिसला. 'मेला' आणि ''इंटरनॅशनल खिलाडी' सारख्या चित्रपटांमध्ये दिसला.

यानंतर ओमकार 2015 मध्ये 'प्यार का पंचनामा 2' चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्याने तरुणची भूमिका साकारली होती. बऱ्याच वर्षांनंतर ओमकारला अचानक पाहून, प्रेक्षक त्याला ओळखू शकले नाहीत कारण त्याचा लूक खूप बदलला होता. लव्ह रंजन यांच्या चित्रपटात ओमकारने केलेल्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

ओंकारने सहायक संचालक संजय लीला भन्साळी, फराह खान आणि अहमद खान यांच्यासोबतही काम केले. ओमकार 'प्यार का पंचनामा 2' नंतर 'तू मी और घर' आणि 'झूठा कभी का' सिनेमात दिसला. पण दोन्ही चित्रपट खेळू शकले नाहीत. आता तो हिरो म्हणून 'झूठा कहीं का', 'प्यार का पंचनामा 2', 'यू मी और घर और भूत' सिनेमात दिसला. येणाऱ्या काळातही त्याचे काही चांगले सिनेमे बघायला मिळणार आहेत.

Web Title: Anil kapoor sridevi on screen son judaai child artist omkar kapoor then and now look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.