अनिल कपूर यांना बनवायचाय या चित्रपटाचा रिमेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 06:00 AM2018-12-23T06:00:00+5:302018-12-23T06:00:00+5:30

सुभाष घई यांचा ८०च्या दशकात प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट राम लखनचा रिमेक निर्माता करण जोहर व दिग्दर्शक रोहित शेट्टी बनवणार होते. मात्र त्यावर वर्कआऊट झाले नाही.

Anil Kapoor remakes this film | अनिल कपूर यांना बनवायचाय या चित्रपटाचा रिमेक

अनिल कपूर यांना बनवायचाय या चित्रपटाचा रिमेक

googlenewsNext

सुभाष घई यांचा ८०च्या दशकात प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट राम लखनचा रिमेक निर्माता करण जोहर व दिग्दर्शक रोहित शेट्टी बनवणार होते. मात्र त्यावर वर्कआऊट झाले नाही. आता चर्चा आहे की अनिल कपूर राम लखन चित्रपटाचा रिमेक बनवण्याचा विचार करीत आहेत. हा रिमेक लखनला केंद्रस्थानी ठेवून बनवला जाणार आहे. 

अनिल कपूर राम लखन चित्रपटाचा रिमेक बनवणार असून त्यात त्यांना त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरला संधी द्यायची आहे. हर्षवर्धनने दोन चित्रपटात काम केले. मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. त्यामुळे अनिल कपूरला त्याला मोठा ब्रेक द्यायचा आहे. अनिल कपूर यांच्या मते, त्यांच्या मुलांमध्ये दम असून खराब चित्रपटांमुळे त्याचे नुकसान झाले आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कपूर यांनी यासंदर्भात सुभाष घई यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि पुढील महिन्यापर्यंत हा प्रोजेक्ट फायनल होणार आहे. तसेच हर्षवर्धनसोबत अनिल कपूर देखील अभिनय करताना दिसतील, असे बोलले जात आहे.
मध्यंतरी अनिल कपूरने आपली मुले वशिलेबाजीमुळे सिनेइंडस्ट्रीत आली नसल्याचे सांगितले होते व म्हणाले की, सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर या आपल्या दोन्ही मुलांना मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून काम वशिलेबाजीमुळे नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्यातील टॅलेंट असल्यानेच मिळतात. आपल्या चित्रपटाच्या यशाबाबत आणि साहजिकच बॉक्स ऑफीसवर मिळणाऱ्या नफ्याबाबत ते फार जागरुक असतात.आजच्या काळात कोणत्याच निर्मात्याला कोट्यवधी रुपये वाया घालवणे परवडणार नाही. चित्रपट तयार करणे ही अत्यंत महागडी गोष्ट आहे. जर त्यांना कलाकारांवर विश्वासच नसेल, तर ते एक दमडीही त्यांच्यावर खर्च करणार नाहीत. वडील म्हणून मला माझ्या मुलांची काळजी आहेच. पण माझ्या सहभागाशिवाय निर्माते आणि दिग्दर्शक त्यांची कास्टिंग करतात

Web Title: Anil Kapoor remakes this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.