आजोबाच्या भूमिका करण्यास अनिल कपूर तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 18:39 IST2016-07-13T13:09:03+5:302016-07-13T18:39:03+5:30

अभिनेता अनिल कपूर याच्या अनुसार तो वडील अथवा आजोबाच्या भूमिका पडद्यावर करण्यास तयार आहे. तो आता ६० वर्षांचा झाला ...

Anil Kapoor is preparing for the role of grandfather | आजोबाच्या भूमिका करण्यास अनिल कपूर तयार

आजोबाच्या भूमिका करण्यास अनिल कपूर तयार

िनेता अनिल कपूर याच्या अनुसार तो वडील अथवा आजोबाच्या भूमिका पडद्यावर करण्यास तयार आहे. तो आता ६० वर्षांचा झाला असला तरी वय त्याच्या कामाच्या आड येणार नाही, असा विश्वास त्याला वाटतो.
अनिल कपूर याने ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात रणवीर सिंग आणि प्रियंका चोप्रा यांच्या वडिलांची भूमिका केली आहे. अनिल म्हणतो, आता मी फॅनी खानकडे पाहतो आहे. ईदच्या दिवशी त्याचे लाँचिंग झाले. त्याची स्क्रीप्ट खूप महत्वाची आहे. या चित्रपटाचा भाग झाल्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. खान नावाची भूमिका मी पहिल्यांदाच करतो आहे, आणि तो वडील देखील आहे.’
२४मध्येही मी वडिलांची भूमिका करतो आहे. मला त्यामध्ये मोठा मुलगा आणि मुलगी असते. दुसºया सिझनमध्ये मी आणि माझा मुलगा यांच्यातील वाद तुम्ही पाहू शकता, असेही अनिलने म्हटले.



Web Title: Anil Kapoor is preparing for the role of grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.