कपूर घराण्याच्या आणखी एका मुलीने शोधला ‘वर’! लग्नाची चर्चा जोरात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:00 IST2019-01-13T19:00:00+5:302019-01-13T19:00:02+5:30

अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर गतवर्षी लग्नबंधनात अडकली. आनंद आहुजासोबत तिने लग्नगाठ बांधली. आता अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. होय, रियाने स्वत:साठी ‘वर’ निवडला आहे आणि याचवर्षी हे लग्न होईल, असे समजतेय.

anil kapoor daughter rhea kapoor may tie the knot with boyfriend karan boolani in 2019 | कपूर घराण्याच्या आणखी एका मुलीने शोधला ‘वर’! लग्नाची चर्चा जोरात!!

कपूर घराण्याच्या आणखी एका मुलीने शोधला ‘वर’! लग्नाची चर्चा जोरात!!

अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर गतवर्षी लग्नबंधनात अडकली. आनंद आहुजासोबत तिने लग्नगाठ बांधली. आता अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. होय, रियाने स्वत:साठी ‘वर’ निवडला आहे आणि याचवर्षी हे लग्न होईल, असे समजतेय.
रिया दीर्घकाळापासून करण बुलानी याला डेट करतेय. काही महिन्यांपूर्वी अनिल कपूरने रियाच्या कथित बॉयफ्रेन्डची भेट घेतली होती. मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर त्यांना पाहिले गेले होते. या फॅमिली डिनरचे फोटोही व्हायरल झाले होते.

अनेकदा करण अनिल कपूरच्या फॅमिली फंक्शनमध्ये दिसला आहे. करण हा क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आहे . ‘आयशा’ आणि ‘वेक अप सिड’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले आहे. ‘द आॅडिशन’ ही शॉर्ट फिल्म त्याने दिग्दर्शित केली आहे. अनेक टीव्ही शोच्या प्रॉडक्शन टीममध्ये त्याने काम केले आहे. तर रिया एक फॅशन डिझाईनर. निर्माती अशीही तिची ओळख आहे.

सोनमच्या लग्नादरम्यान रिया व करणने आपले नाते जगजाहिर केल्याचे मानले जाते. करणने रियासोबतचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये ‘माय गर्ल’ असे त्याने लिहिले होते. त्यापूर्वी फॅशन डिझाईनर संदीप खोसला व अबु जानीच्या भाचीच्या लग्नात दोघांनाही एकत्र पाहिले गेले होते.

केवळ इतकेच नाही तर अनिल कपूरचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नातही करण सहभागी झाला होता. याशिवाय रियाची आई सुनीता कपूर हिच्या लंडनमधील बर्थ डे सेलिब्रेशनवेळीही तो रियासोबत होता.

Web Title: anil kapoor daughter rhea kapoor may tie the knot with boyfriend karan boolani in 2019