अनिल कपूर आणि अर्जुन कपूरला कपिल शर्माने पाहायला लावली तब्बल 4 तास वाट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 16:29 IST2017-07-20T09:19:20+5:302017-07-20T16:29:16+5:30

कपिल शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत आहेत. सुनील ग्रोव्हरशी झालेल्या भांडणानंतर कपिलाच्या शो ची टीआरपी दिवसेंदिवस कमी ...

Anil Kapoor and Arjun Kapoor were seen by Kapil Sharma for 4 hours? | अनिल कपूर आणि अर्जुन कपूरला कपिल शर्माने पाहायला लावली तब्बल 4 तास वाट?

अनिल कपूर आणि अर्जुन कपूरला कपिल शर्माने पाहायला लावली तब्बल 4 तास वाट?

िल शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत आहेत. सुनील ग्रोव्हरशी झालेल्या भांडणानंतर कपिलाच्या शो ची टीआरपी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तसेच कपिल आपल्या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रेटींनाही खूप वेळा वाट पाहायला लावत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी कपिलच्या सेटवर 'ओके जानू'च्या प्रमोशनासाठी आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर आले होते. या दोघांना कपिलने खूप वेळ वाट पाहायला लावली. त्यानंतर पोस्टर बॉइजला प्रमोट करण्यासाठी आलेल्या सनी देओसोबत देखील हाच प्रकार घडला यानंतर सनी देओल कपिलवर नाराज झाला होता. या यादीत आता आणखीन एक नाव शामिल झाले आहे ते म्हणजे मुबाराकांच्या टीमचे. अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ आणि आथिया शेट्टी मुबाराकांची संपूर्ण स्टार कास्ट चित्रपटाच्या प्रमोशनासाठी कपिलच्या सेटवर आली होती. मात्र त्यांना शूट केल्याशिवायच परतावे लागले. 

मुबारकांच्या टीमला आधी सांगण्यात आले कपिलची तब्येत ठिक नाही आहे मात्र तरीही तो लवकरच सेटवर येऊन शूटिंग पूर्ण करणार आहे. तब्बल 4 तास उलटल्यानंतरही कपिल सेटवर आलाच नाही शेवटी नाराज झालेल्या मुबाराकांच्या टीमने तिथून शूट न करताच परतण्याचा निर्णय घेतला. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार चित्रपटाची सायंकाळी टीम साढे पाच वाजता कपिलच्या सेटवर आली आणि रात्री 10 वाजेपर्यंत कपिलची वाट पाहात बसली. 10 वाजले तरी कपिलचा काहीच पत्ता नव्हता मग नाराज झालेल्या मुबाराकांच्या टीमने तिथून परतण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे अशी चर्चा आहे की सेटवर कपिल शर्माची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आले. त्यामुळे शूट होऊ शकले नाही.      

काही दिवसांपूर्वी शाहरुख खान आणि अनुष्का शर्माला देखील अशाच प्रसंगाला सामोरे जावं लागले होते. 'जब हैरी मेट सेजल'चे प्रमोशन करण्यासाठी ते या मंचावर आले होते. त्यावेळी अचानक तब्येत बिघडल्यामुळे कपिल सेटवर पोहोचू शकला नाही. शेवटी शूटिंग न करताच शाहरुख आणि अनुष्का परतले.    

Web Title: Anil Kapoor and Arjun Kapoor were seen by Kapil Sharma for 4 hours?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.