कोण आहे ही २२ वर्षीय अभिनेत्री? 'सैय्यारा' सिनेमात चंकी पांडेच्या पुतण्यासोबत करणार रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:06 IST2025-05-30T14:04:55+5:302025-05-30T14:06:11+5:30
अहान पांडे आणि 'या' अभिनेत्रीच्या रोमँटिक केमिस्ट्रीची चर्चा

कोण आहे ही २२ वर्षीय अभिनेत्री? 'सैय्यारा' सिनेमात चंकी पांडेच्या पुतण्यासोबत करणार रोमान्स
अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सध्या बॉलिवूड गाजवत आहे. तिच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आहे. तसंच 'कॉल मी बे', 'ctrl' या सीरिज, सिनेमांमधन तिने आपल्या अभिनयाची चुणूकही दाखवली. आता चंकी पांडेचा २७ वर्षीय पुतण्या अहान पांडेही (Ahaan Panday) बॉलिवूड पदार्पणसाठी सज्ज आहे. आगामी 'सैय्यारा' सिनेमातून तो पदार्पण करत आहे. दरम्यान या सिनेमात तो २२ वर्षीय अनीत पड्डासोबत रोमान्स करताना दिसत आहे. अनीता पड्डा नक्की आहे तरी कोण?
नुकताच 'सैय्यारा' सिनेमाचा टीझर रिलीज झाला. १८ जुलै रोजी सिनेमा बिग स्क्रीवर येणार आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा (Aneet Padda) ही फ्रेश जोडी सिनेमात दिसणार आहे. टीझरमध्येच यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांचे काही किसींग सीन्सही आहेत. अनीत पड्डाने याआधीही काही सिनेमांमध्ये काम केलं आहे.
कोण आहे अनीत पड्डा?
अनीत पड्डाचा जन्म १४ ऑक्टोबर २००२ साली झाला. आपल्या गुड लूक्स आणि स्क्रीन प्रेझेन्सने ती बॉलिवूड इंडस्ट्रीत वेगळी वाट शोधत आहे. अनीतने २०२२ साली आलेल्या 'सलाम व्हेंकी' सिनेमातून पदार्पण केलं होतं. यामध्ये ती नंदिनीच्या भूमिकेत होती. त्यानंतर २०२४ साली ती अॅमेझॉन प्राईमवरील 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' या वेबसीरिजमध्ये दिसली. याशिवाय तिने काही जाहिरातींमध्येही काम केलं. आता तिला 'सैय्यारा' सिनेमात थेट मुख्य अभिनेत्रीची संधी मिळाली आहे.
'सैय्यारा'चं दिग्दर्शन मोहित सुरींनी केलं आहे. यशराज फिल्म्सने सिनेमाची प्रस्तुती केली असून अक्षय विधानीने निर्मिती केली आहे. १८ जुलै रोजी सिनेमा रिलीज होत आहे.