आंद्रे रसेल आता बॉलिवूडच्या पिचवर आजमावणार नशीब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 21:17 IST2017-04-15T15:47:48+5:302017-04-15T21:17:48+5:30
वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंना नेहमीच बॉलिवूडचे आकर्षण राहिले आहे. त्यामुळे प्रत्येक आयपीएलनंतर एकतरी खेळाडू हा बॉलिवूडच्या वाटेवर असल्याचे गेल्या काही ...

आंद्रे रसेल आता बॉलिवूडच्या पिचवर आजमावणार नशीब!
व स्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंना नेहमीच बॉलिवूडचे आकर्षण राहिले आहे. त्यामुळे प्रत्येक आयपीएलनंतर एकतरी खेळाडू हा बॉलिवूडच्या वाटेवर असल्याचे गेल्या काही वर्षांपासून पुढे येत आहे. सुरुवातीला ड्वेन ब्राव्हो अन् आता अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल बॉलिवूडच्या पिचवर नवी इनिंग सुरू करण्यास सज्ज झाला आहे.
आंद्रे रसेल लवकरच त्याचा आंतरराष्ट्रीय म्युझिक व्हिडीओ घेऊन येत आहे. या म्युझिक व्हिडीओबरोबरच तो बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. शनिवारी आलेल्या माहितीनुसार आंद्रे रसेलने सांगितले की होय, हे खरं आहे की, मी इंटरटेन्मेंटमध्ये करिअर करण्यास तयार आहे. मी यावर्षी माझा पहिला आंतरराष्ट्रीय संगीत व्हिडीओ भारतात रिलीज करणार आहे. त्यानंतर मी बॉलिवूड चित्रपटांमध्येही अभिनय करणार आहे.
![]()
वास्तविक हा व्हिडीओ लॉस एंजलिस येथील जॅमिनी मुसिकने बनविला असून, त्यांनी नुकतेच ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक जस्टिन बीबरच्या ‘सॉरी’ या एल्बमची निर्मिती केली आहे. दरम्यान, आंद्रेचा हा म्युझिक अल्बम या वर्षाच्या अखेरपर्यंत रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. आंद्रेने त्याच्या या इंटरटेन्मेंट करिअरचे श्रेय ड्वेन ब्रावो याला दिले आहे. तो म्हणतो की, ब्रावोच्या ‘चॅम्पियन’, ‘जाग्रबोम्ब’ आणि ‘ट्रिप अभी बाकी हैं’ या अल्बममधूनच त्याला म्युझिक व्हिडीओ बनविण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्याचबरोबर बॉलिवूडपटांमध्ये अभिनय करण्याचादेखील मी विचार करीत आहे.