​...आणि टायगर संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 16:39 IST2016-06-29T11:09:49+5:302016-06-29T16:39:49+5:30

टायगर श्रॉफ व दिशा पटानी यांच्यातील रिलेशनशिपच्या चर्चा सध्या जोरात आहे. या चर्चेला हवा देणारी आणखी एक बातमी आमच्या ...

... and Tiger is angry | ​...आणि टायगर संतापला

​...आणि टायगर संतापला

यगर श्रॉफ व दिशा पटानी यांच्यातील रिलेशनशिपच्या चर्चा सध्या जोरात आहे. या चर्चेला हवा देणारी आणखी एक बातमी आमच्या कानावर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर व दिशा दोघेही २००२ मध्ये आलेल्या ‘आंखे’च्या सीक्वलमध्ये दिसणार होते. मात्र हे होऊ शकले नाहीत. टायगरचे नाव तर फायनल झाले होते. मात्र अचानक दिशाला साईनलाईन करण्यात आले. तिच्यासोबत बºयाच दिवसांपासून मेकर्सची चर्चा सुरु होती. याऊपरही ऐनवेळी मेकर्सने तिला नकार दिला. यामुळे टायगर चांगलाच संतापला आणि संतापाच्या भरात हा चित्रपट टायगरने सोडला. पुढील महिन्यात ‘आंखे’ची शूटींग सुरु होतेय. यात टायगर महत्त्वपूर्ण भूमिकेत होता आणि दिशासोबत टायगरच्या अपोझिट रोलसाठी चर्चा सुरु होती. मात्र नंतर मेकर्सने दिशाऐवजी एक नवा चेहरा घेण्याचा निर्णय घेतला. टायगरला मेकर्सचा हा निर्णय कळला आणि तो संतापला. दिशा नाही तर मग मीही नाही, असे म्हणून मग त्यानेही यात काम करण्यास नकार दिला. याबाबत विचारले असता, मला अशी कुठलीही आॅफर मिळाली नव्हती, असे सांगून टायगरने वेळ मारून नेली. पण सत्य कुठे लपतेयं??

Web Title: ... and Tiger is angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.