...आणि सोनम कपूरचे हे स्वप्न झाले पूर्ण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 17:25 IST2017-10-14T11:41:20+5:302017-10-14T17:25:20+5:30

बॉलिवूडमध्ये रिअल लाईफ नात्यांना एकत्र काम करताना बघायचा वेगळेच अनुभव येतो. रिअल लाईफमधील आई-वडिल आणि त्यांची मुलं यांना स्क्रिनवर ...

... and Sonam Kapoor's dream is over! | ...आणि सोनम कपूरचे हे स्वप्न झाले पूर्ण !

...आणि सोनम कपूरचे हे स्वप्न झाले पूर्ण !

लिवूडमध्ये रिअल लाईफ नात्यांना एकत्र काम करताना बघायचा वेगळेच अनुभव येतो. रिअल लाईफमधील आई-वडिल आणि त्यांची मुलं यांना स्क्रिनवर एकत्र काम करताना बघायची एक वेगळीच मजा असते. अशीच एक रिअल लाईफमधील बाप-लेकीची जोडी लवकरच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 

ही जोडी दुसरी तिसरी कोणी नसून  अनिल कपूर आणि त्याची लेक सोनम कपूरची आहे. वैयक्तिक आयुष्यात ते दोघे एकत्रच आहेत. सोनम आपल्या वडिलांना आपला आदर्श मानते. अनिल कपूर आणि मनिषा कोईरालाच्या जोडीचा '१९४२ अ लव्ह स्टोरी' हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या गाण्याच्या टायटलवर चित्रपट तयार करण्यात येतो आहे. यात ही बाप-लेकीची जोडी दिसणार आहे. सोनमचे वडिलांसोबत स्क्रिन शेअर करण्याचे स्वप्न होते. 

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा चित्रपट विधु विनोद चोप्राची बहीण शैली चोप्रा दिग्दर्शित करत आहे. काही दिवसांपूर्वी शैली संजय दत्त बरोबर काम करत आहे अशी चर्चा होती. पणनंतर असे ऐकण्यात आले की संजय दत्तचे म्हणणे होते की त्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर पुन्हा एकदा काम करण्याची गरज आहे. त्यामुळे तो चित्रपट मागे पडला. सोनम कपूरच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर ती सध्या 'वीरे दि वेडिंगच्या' शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासह करिना कपूर खान आणि स्वरा भास्कर यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. फॅमिलीसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी  सोनमने शूटिंगमधून पाच दिवसांची सुट्टी घेतली आहे. तर सोनमचे वडिल अनिल कपूर सध्या फन्ने खानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. यात अनिल कपूरसह ऐश्वर्या रॉय आणि राजकुमार राव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

ALSO RAED :  को-स्टारसोबत सेक्स करण्यावरून ‘हे’ काय बोलून गेली सोनम कपूर?

अनिल कपूर मागच्या वेळेस आपल्या भाचा अर्जुन कपूरसोबत 'मुबारकाँ' चित्रपटात दिसला होता. काका पुतण्याची ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यामुळे आता पाहायचे आहे की अनिल कपूर आणि सोनम एकत्र येऊन पडद्यावर आपली छाप पाडण्यात यशस्वी होतात का. 

Web Title: ... and Sonam Kapoor's dream is over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.