- आणि म्हणून शक्ती कपूर बनलेत तृतीयपंथी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 14:24 IST2017-10-03T08:54:00+5:302017-10-03T14:24:00+5:30
अनेक चित्रपटात आपल्या विनोदी भूमिकांमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, अनेक चित्रपटात हिरोच्या तोडीचा खलनायक साकारून चाहत्यांना प्रभावित करणारे अभिनेते शक्ती ...

- आणि म्हणून शक्ती कपूर बनलेत तृतीयपंथी!
अ ेक चित्रपटात आपल्या विनोदी भूमिकांमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, अनेक चित्रपटात हिरोच्या तोडीचा खलनायक साकारून चाहत्यांना प्रभावित करणारे अभिनेते शक्ती कपूर आता एका वेगळ्या भूमिकेत तुमच्याआमच्या भेटीला येणार आहेत. होय, ‘रक्तधार’ या चित्रपटात शक्ती कपूर तृतीयपंथीयाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही भूमिका त्यांनी आजपर्यंत केलेल्या अनेक भूमिकांपेक्षा निश्चितपणे आव्हानात्मक आहे आणि त्यामुळेच त्यांना या भूमिकेत पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
![]()
या चित्रपटाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खुद्द शक्ती कपूर आपल्या या भूमिकेबद्दल प्रचंड उत्सूक आहेत.
तृतीयपंथीय समाजातील एक अविभाज्य घटक आहे. पण ब-याच ठिकाणी त्यांना समान हक्कांपासून वंचित ठेवले जाते. त्यांना इतरांप्रमाणेच सर्व हक्क मिळावेत, हाच आमच्या चित्रपटाचा उद्देश आहे. लहान-सहान गोष्टीही मोठा बदल घडवू शकतात. ‘रक्तधार’ एक बिग बजेट चित्रपट नाही. पण या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला समाजाला जो संदेश द्यायचा आहे, तो देण्यात आम्ही यशस्वी होऊ, हा विश्वास आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलेल. लोक या वर्गाचा मोठ्या मनाने स्वीकार करतील, अशी मी आशा बाळगतो, असे शक्ती कपूर म्हणाले.
दिग्दर्शक अजीत वर्मा यांनीही शक्ती कपूर यांच्या सूरात सूर मिसळत, या चित्रपटाच्या यशाची कामना केली. तृतीयपंथीयांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवले गेले आहे. त्यांना समाजात समान संधी व समान अधिकार मिळावेत, यासाठी ‘रक्तधार’ हा आमचा लहानसा प्रयत्न आहे. या प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो तर ‘रक्तधार’ यशस्वी झाला असे आम्ही समजू, असे वर्मा म्हणाले.
ALSO READ : शक्ती कपूरच्या कडेवरील ही चिमुकली आहे तरी कोण?जी आज आहे बॉलिवूडची हसीना
प्रेम, राजकारण, सूड आणि भारतीय समाजातील तृतीयपंथीयांचे स्थान यावर भाष्य करणारा ‘रक्तधार’ निश्चितपणे एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट असणार आहे. शक्ती कपूर यांची यातील भूमिकाही तेवढीच वेगळी असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना निश्चितपणे या चित्रपटाची प्रतीक्षा असणार आहे.