​- आणि साजिद खानवर भाळली हवाईसुंदरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 10:31 IST2016-10-06T11:31:02+5:302016-10-07T10:31:42+5:30

बायकांना इंप्रेस करण्यात दिग्दर्शक साजिदखान एकदम माहिर आहे. (श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस अशीच साजिदच्या प्रेमात पडली नव्हती!) खुद्द साजिदचा ...

- And Sajid Khan's airplane aerodrome! | ​- आणि साजिद खानवर भाळली हवाईसुंदरी!

​- आणि साजिद खानवर भाळली हवाईसुंदरी!

यकांना इंप्रेस करण्यात दिग्दर्शक साजिदखान एकदम माहिर आहे. (श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस अशीच साजिदच्या प्रेमात पडली नव्हती!) खुद्द साजिदचा मित्र रितेश देशमुख यानेच हा खुलासा केला. एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर रितेशने साजिदची अनेक गुपित उघड केलीत. यापैकीच एक म्हणजे, साजिद महिलांना इंप्रेस करण्यात अगदीच निपुण आहे. होय, विमानात बसल्याबसल्या साजिदने एका हवाईसुंदरीला कसे अगदी अलगद आपल्या मोहपाशात अडकवले होते, याचा किस्सा रितेशने  यावेळी सांगितला. काही वर्षांपूर्वी रितेश व साजिद एका अवार्ड फंक्शनच्या निमित्ताने एकत्र विदेशात गेले होते. दोघेही प्रथमच बिझनेस क्लासने विमान प्रवास करत होते. त्यामुळे दोघेही आनंदात होते. याचदरम्यान साजिदने आपल्या हसतमुख चेहºयाने आणि गोड गोड गप्पांनी एका हवाईसुंदरीला चांगलेच प्रभावित केले. यानंतर अख्ख्या विमानप्रवासात ही हवाईसुंदरी साजिदची विशेष काळजी घेतांना दिसली. लंचनंतर या हवाईसुंदरीने साजिदला ‘हाऊ इज द लंच?’ असा प्रश्न केला. यावर साजिदने काय करावे, तर क्षणाचाही विलंब न करता त्या हवाईसुंदरीचा मोबाईल नंबर मागितला. विशेष म्हणजे तिने तो साजिदला दिलाही. हा किस्सा सांगताना रितेशला हसू आवरेनासे झाले. साहजिक साजिदनेही हा क्षण तितकाच एन्जॉय केला.

Web Title: - And Sajid Khan's airplane aerodrome!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.